लेण्याद्री वार्ताहर - प्रवीण ताजणे बारव ता जुन्नर येथील प्राथमिक विद्यामंदिरा मध्ये जिडीबी इंटरनॅशनल व रोटरी क्लब च्या सहकार्याने रंगकाम ...
लेण्याद्री वार्ताहर - प्रवीण ताजणे
बारव ता जुन्नर येथील प्राथमिक विद्यामंदिरा मध्ये जिडीबी इंटरनॅशनल व रोटरी क्लब च्या सहकार्याने रंगकाम पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती अभियंता आणि रोटेरियन मिलिंद घोडेकर यांनी दिली. रंगकामासाठी रोटरी ३१३१ च्या वतीने ममता कोल्हटकर, मीनल अवचट आणि सचिन देशपांडे यांनी सहकार्य केले.
तालुक्यामध्ये अधिकाधिक शाळांमध्ये हा प्रकल्प राबविणार असल्याचे रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे जेष्ठ रोटेरियन विनायक कर्पे, डॉ अमोल पुंडे आणि विनायक भागवत यांनी सांगितले. तर या प्रोजेक्ट अंतर्गत जुन्नर तालुक्यातील काही शाळांमध्ये रंगकाम प्रगती पथावर असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे माजी अध्यक्ष आणि प्रकल्प समन्वयक धनंजय राजूरकर यांनी दिली.
प्रतिक्रिया - रोटरी क्लबच्या सहकार्याने दरवर्षी १०० गरजू शाळांना मोफत रंग देण्याचे कंपनीने उद्दिष्ट ठेवलेले आहे. त्यानुसार यावर्षी 75 शाळांपर्यंत कंपनीच्या वतीने मोफत रंग पोहोचविण्यात आलेला आहे.......... संजीव बगारिया प्रमुख जिडीबी इंटरनॅशनल कंपनी
शाळांना सहज आणि सोप्या पद्धतीने रंग मिळवून देण्यासाठी आम्ही सातत्याने सहकार्य करत आहोत. या उपक्रमासाठी शाळांची निवड रोटरी क्लबच्या मदतीने केली जाते. ............अतुल कुलकर्णी प्रोजेक्ट मॅनेजर, जिडीबी इंटरनॅशनल
COMMENTS