प्रतिनिधी - प्रा. प्रविण ताजणे सर खोडद येथील जी एम आर टी मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या प्रकल्प स्पर्धेत समर्थ कॉलेज ऑ...
प्रतिनिधी - प्रा. प्रविण ताजणे सर
खोडद येथील जी एम आर टी मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या प्रकल्प स्पर्धेत समर्थ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट बेल्हे या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील वैष्णवी गणेश व ऋतुजा गवांदे या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या "कृषी तज्ञ" या प्रकल्पास द्वितीय क्रमांक तर निखिल मोरे व महेश झिंजाड या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या "स्किन कॅन्सर डिटेक्शन अँड प्रेस्क्रीप्शन युजींग मशीन लर्निंग" या प्रकल्पास उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाल्याची माहिती अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे यांनी दिली.
या विद्यार्थ्यांना कम्प्युटर इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा.स्नेहा शेगर,इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिक मेडिकेशन इंजीनियरिंग विभाग प्रमुख प्रा.निर्मल कोठारी,डॉ.निवृत्ती चौधरी,प्रा.राणी बोऱ्हाडे यांनी मार्गदर्शन केले.
त्याचप्रमाणे बी एस्सी,डिप्लोमा गटामध्ये तृतीय वर्ष डिप्लोमा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मधील समीक्षा जाधव,यश फुलसुंदर,साक्षी भोर आणि संस्कृती रोहकले यांनी तयार केलेल्या "इंटेलिजंट ट्राफिक कंट्रोल सिस्टीम" या प्रकल्पास तृतीय क्रमांक तर सोहम शिंदे,सृष्टी पाडेकर,वैष्णवी वायकर आणि ओमकार भोर या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या "ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्शन युजिंग मशीन लर्निंग" या प्रकल्पास उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाल्याची माहिती समर्थ पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.अनिल कपिले यांनी दिली.या विद्यार्थ्यांना प्रा.नंदकिशोर मुऱ्हेकर,प्रा.महेंद्र खटाटे,प्रा.स्वप्निल नवले,प्रा.शाम फुलपगारे,प्रा.अश्विनी टेमगिरे यांनी मार्गदर्शन केले.
सदरच्या विज्ञान प्रदर्शनात राज्यभरातून तसेच राज्याच्या बाहेरून देखील प्रकल्प सादर करण्यात आले होते.
विज्ञान प्रदर्शनाचे पारितोषिक वितरण एनसीआरए चे प्रोफेसर सी एच ईश्वर चंद्रा,वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी डॉ.जे.के.सोळंकी,प्रशासकीय अधिकारी अभिजित जोंधळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
समर्थ शैक्षणिक संकुलातील डिप्लोमा व डिग्री चे विद्यार्थी नवनवीन वैज्ञानिक संकल्पना घेऊन समाजाभिमुख गरजांची पूर्ती करणारे प्रकल्प सादर करण्याचा प्रयत्न करत असतात.दरवर्षी प्रथम,द्वितीय,तृतीय,चतुर्थ क्रमांक अशी पारितोषिके पटकावत असतात.याही वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी दर्जेदार प्रकल्प सादर करून यश संपादन केले आहे.त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,समर्थ अभियांत्रिकीचे प्राचार्य नवनाथ नरवडे,पॉलिटेक्निकचे प्राचार्य अनिल कपिले,टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले,प्रा.संजय कंधारे,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर तसेच संकुलातील सर्व प्राचार्य विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
COMMENTS