प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे नुकताच "जागतिक लाईनमन दिव...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे नुकताच "जागतिक लाईनमन दिवस" व "राष्ट्रीय सुरक्षा दिवस" साजरा करण्यात आला.वीज क्षेत्रातील आघाडीचे नायक म्हणून ज्यांना संबोधले जाते,त्यांच्या निस्वार्थ योगदानाबद्दल कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यासाठी ४ मार्च हा जागतिक लाईनमन म्हणून ओळखला जातो.
एकविसाव्या शतकातील जीवनमान विद्युत व्यवस्थेची निगडित आहे.दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती विजेवर आधारित उपकरणांचा वापर करत असतो.अशा वेळेस निरंतर वीजपुरवठा सुरू राहावा यासाठी लाईनमन कर्तव्याच्या भावनेतून अहोरात्र कार्यरत असतात.वादळ,वारा,पाऊस अशा नैसर्गिक आपत्तीत सुद्धा प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून लाईनमन कार्यरत राहतात आणि आपल्यासाठी अखंडित वीजपुरवठा करण्याचे काम करतात.त्यांच्याप्रती कृतज्ञता प्रकट करण्यासाठी आज जागतिक लाईनमन दिवसाच्या निमित्ताने बेल्हे सब स्टेशनच्या हद्दीत कार्यरत असणाऱ्या राजुरी,बेल्हे व अणे परिसरातील सर्व लाईनमन तंत्रज्ञ,प्रधान व सहाय्यक अभियंता यांचा समर्थ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट,बेल्हे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने शाल देऊन कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला.
यावेळी बेल्हे सब स्टेशनचे सहाय्यक अभियंता कृष्णा कोळी,प्रधान तंत्रज्ञ गोविंद आनेराव,वरिष्ठ तंत्रज्ञ अविनाश सोळंकी,वरिष्ठ तंत्रज्ञ रामेश्वर कोलूगडे,वरिष्ठ तंत्रज्ञ निळकंठ फुंदे,वरिष्ठ तंत्रज्ञ दत्तात्रय भारती,तंत्रज्ञ विवेक पाटील,विद्युत सहाय्यक मुसद्दीक शेख,विद्युत कर्मचारी राहुल बोरचटे,विद्युत कर्मचारी संतोष घोडके आदि मान्यवर उपस्थित होते.
बेल्हे सब स्टेशनचे कृष्णा कोळी साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.अनेक तांत्रिक गोष्टी समजावून सांगितल्या.लाईनमन म्हणजे समाजासाठी अहोरात्र काम करणारे प्रकाशदूत असून अंधाराविरुद्ध लढणारे खरे योद्धे आहेत असे मत यावेळी सहाय्यक अभियंता कृष्णा कोळी यांनी व्यक्त केले.
डॉ.प्रतिक मुणगेकर,डॉ.नवनाथ नरवडे,प्रा.प्रदीप गाडेकर यांनी यावेळी मनोगते व्यक्त केली.
याप्रसंगी उपस्थित सर्व विद्यार्थी,कर्मचारी यांना विद्युत सुरक्षिततेची व सुरक्षाविषयक नियम पाळण्याची शपथ देण्यात आली.साक्षी सरोदे या विद्यार्थिनीने कविता सादर करून लाईनमन विषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे,रिसर्च इनोव्हेशन व इंटरनॅशनलायझेशन सेल चे प्रमुख डॉ.प्रतिक मुणगेकर,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा.विशाल जोशी,विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.निलेश नागरे तसेच सर्व विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यश बोडके या विद्यार्थ्याने तर आभार विभागप्रमुख प्रा.विशाल जोशी यांनी मानले.
COMMENTS