प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर एक महिला सक्षम झाली तर एक कुटुंब सक्षम होते, आणि अशा सक्षम कुटुंबातून नवीन भारत उदयाला येतो. पुरस्कारामुळे...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
एक महिला सक्षम झाली तर एक कुटुंब सक्षम होते, आणि अशा सक्षम कुटुंबातून नवीन भारत उदयाला येतो. पुरस्कारामुळे काम करण्याची उर्मी वाढते. पुरस्कार हे दिशादर्शक असतात आणि एका पुरस्काराने अनेक व्यक्तिमत्व घडत असतात ,असे प्रतिपादन पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे सर यांनी व्यक्त केले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व सह्याद्री महिला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार, दिनांक 9 मार्च 2025 रोजी जुन्नर येथे, आयोजित केलेल्या - महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री तसेच 20 कर्तुत्वान महिलांना तेजस्विनी पुरस्कार प्रदान सोहळा या कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
महिला बचत गटांच्या चळवळीतून अनेकांना रोजगार उपलब्ध झालेले आहेत आणि अशा छोट्या-मोठ्या रोजगारातून अनेक कर्तुत्वान महिलांना आपली प्रतिभा जगापुढे आणण्याची संधी मिळाली आहे ,असे गौरवोद्गार उपाध्यक्ष सुनील चांदणे यांनी व्यक्त केले.
जुन्नर शहरात आयोजित केलेल्या या उपक्रमामुळे बचत गटाची चळवळ अधिक सक्षम होऊन तळागाळातील महिलांना त्याचा लाभ होऊन यातून एक नवे नेतृत्व उदयास येईल असा मला विश्वास वाटतो असे गौरवोद्गार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. संजयराव काळे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रम प्रसंगी जुन्नर तालुक्यातील 45 महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे विक्री व प्रदर्शन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानामध्ये आयोजित केले होते. या एक दिवसीय प्रदर्शन व विक्री केंद्र मधून सुमारे आठ ते दहा लाखाची उलाढाल होऊन, बचत गटांनी विक्रीसाठी आणलेल्या सर्व वस्तूंची विक्री झाली तसेच अतिशय चविष्ट पदार्थांनी बनवलेल्या खाद्यपदार्थाची सुद्धा मोठ्या प्रमाणात विक्री होऊन ,नागरिकांनी त्याचा आस्वाद घेतला
या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जुन्नर तालुक्यातील प्रतिभासंपन्न, कर्तुत्ववान अशा 20 महिलांना त्यांनी त्यांच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तेजस्विनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह, मानपत्र, गौरव पदक ,शाल ,श्रीफळ व भेटवस्तू असे होते.
सर्व पुरस्कारथी महिलांचे गुलाबी रंगाचे फेटे बांधून ,औक्षण करून त्यांचे कार्यक्रमस्थळी स्वागत करण्यात आले.त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची माहिती मंचकावरील एलईडी स्क्रीन वरती चित्रफितीद्वारे दाखवून त्यांच्या कार्याचा परिचय उपस्थित जनसमुदायाला करून देण्यात आला. पुरस्कारार्थी महिलांमध्ये श्रीमती. संगीता गायकवाड (यशस्वी उद्योजिका ),श्रीमती इंदुबाई बेनके (आदर्श माता) ,सौ.धनश्री वऱ्हाडी (समाजसेविका), सौ.अरुणा जेजुरकर (आदर्श शेतकरी), सौ. अंजली वामन (आदर्श सरपंच ),सौ. काव्या दातखिळे (कृषी कन्या), सौ. सुलोचना डोके (आदर्श अंगणवाडी सेविका), सौ. मनीषा जगताप( उत्कृष्ट बचत गट संघटिका), सौ.वनिता ढोले (आदर्श अंगणवाडी सेविका) श्रीमती.अलकाताई माळी (आदर्श अंगणवाडी सेविका), श्रीमती नागुताई खराडे (आदर्श आरोग्य सेविका ),कुमारी अक्षता ढोबळे (युवा खेळाडू प्रशिक्षिका ), श्रीमती लिलाबाई रगतवान (आदर्श शिक्षिका), कुमारी ससाने (उत्कृष्ट बालवक्ति), सौ.रोहिणी रोकडे( यशस्वी उद्योजिका), सौ. सुनीता वामन (उत्कृष्ट निवेदिका), श्रीमती भाग्यश्री टोणपे (कर्तव्यदक्ष वनविभाग अधिकारी ),सौ. सुंदर कुऱ्हाडे (महिला सक्षमीकरण उद्योजिका), सौ. सुनीता बनकर (धाडसी महिला), आशा कर्तुत्वान महिलांना तेजस्विनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या पारितोषिक वितरण समारंभाला अलकाताई फुलपगार, अरुणशेठ पारखे ,संतोष बेनके ,पापा खोत, योगिनी खैरे ,सुजाता डोंगरे, प्रियांका शेळके, बाळासाहेब मोरे, सुभाष कवडे, बाळासाहेब मुरादे, सौ. मंदाकिनी दांगट, आदी मान्यवर मंचकावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजिका पूजाताई संभाजी बुट्टे पाटील यांनी केले.सूत्रसंचालन मेघनाथ जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुभाष कवडे साहेब यांनी केले.
कार्यक्रमाचे नियोजन हर्षल घोलप, सौरभ बुट्टे, प्रज्वल बुट्टे, शिंदे मंडप डेकोरेशनचे नवनाथ शिंदे ,चेतन लाईट डेकोरेटर्सचे चेतन शिंदे, शिवनेरी एलईडी स्क्रीनचे प्रसाद बोराडे,तन्मय कोल्हे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सह्याद्री महिला प्रतिष्ठानच्या शोभा शिंदे,कांचन मेहेर,जरीना शेख,अर्चना पवार,स्वाती दौंडकर,रेशमा डोके, सीमा रगतवाल ,सुनीता राक्षे,वंदना काशीद,सुनिता उतळे ,अनिता मातेले, भारती काजळे,किशोरी खंडागळे ,सोनाली रोकडे,सरस्वती बोराडे ,नूतन तांबे,शोभा चिलप, श्रुतिका बुट्टे पाटील, पुष्पा बुट्टे, कांचन बुट्टे ,गौरी बुट्टे, सुरेखा बुट्टे, मोहिनीताई बुट्टे ,रोहिणी बुट्टे, अनुराधा देसाई, शर्मिला बुट्टे, कल्पना ढोले, रूपाली वाईकर ,जाई माझीरे व इतर सह्याद्री महिला प्रतिष्ठानच्या महिला पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कष्ट घेतले.
COMMENTS