प्रतिनिधी: प्रा. डॉ. अभिजित पाटील सर श्री शिव छत्रपती महाविद्यालय, जुन्नर येथे दि. ११ व १२ मार्च रोजी राज्यशास्र विभाग आयोजित महाराष्ट्र शास...
प्रतिनिधी: प्रा. डॉ. अभिजित पाटील सर
श्री शिव छत्रपती महाविद्यालय, जुन्नर येथे दि. ११ व १२ मार्च रोजी राज्यशास्र विभाग आयोजित महाराष्ट्र शासन उपक्रम भारतीय संविधानास ७५ वर्षेपुर्तीनिमित्त (अमृत महोत्सव) सन २०२४-२५ “घर घर संविधान” आणि “जागर संविधानाचा” यासारखे कार्यक्रम साजरे करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक आणि कवी तसेच लेखक प्रा. डॉ. श्रीरंजन आवटे हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाघमारे होते. प्रा. डॉ. श्रीरंजन आवटे यांनी भारतीय संविधानाचे श्रेष्ठत्व उदाहरणासहीत समजावून सांगितले.
भारतीय संविधानाची उत्पती तसेच विद्यार्थ्यांना संविधानातील मुलभूत हक्क, समता न्याय, स्वात्र्यंत असे अनेक मुद्दे समजावून सांगितले. भारतीय लोकशाहीची सध्याची परिस्थिती यावर विवेचन केले. यासोबतच जगातील अनेक संविधानापेक्षा भारतीय संविधान तुलनात्मक अभ्यासपूर्वक मांडणी करून विद्यार्थ्यांना त्याची मुल्ये जोपासण्यास सांगितले. स्वलिखित पुस्तक “आपल आयकार्ड” यासारखे भारतीय संविधान आपले आयकार्ड हि संज्ञा मुलांमध्ये रुजवण्यात आली. पाहुणे म्हणून जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्षांचे प्रतिनिधी प्रा. विलास कुलकर्णी यांनी भारतीय संविधानासाठी राजकीयदृष्ट्या पोषक असे वातावरण निर्माण होणे किती महत्वाचे आहे, हे सांगितले. भारतीय संविधानाचे सफल ७५ वर्षे पाठपुरावा दिला. भारतीय संविधानातील न्यायाची भूमिकेचे महत्व अधोरेखित केले. यासोबतच विद्यार्थ्यांना मुलभूत कर्तव्याची जाणीव करून दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाघमारे यांनी मुलभूत हक्क या हक्कांची जाणीव भारतीय नागरिकांमध्ये व्हावी. तसेच या कार्यक्रमादरम्यान भारतीय संविधानाचे उद्देश्पात्रिकेची कोनशीलेचे अनावरण प्रा. विलास कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
यासोबतच भारतीय संविधानाचे ७५ वर्षेनिमीत्ताने भित्तीपत्रके तसेच विविध मॉडेल विद्यार्थ्यांनी तयार करून आणले होते. यासोबतच त्यांनी सादरीकरण देखील केले. कु.उमेश भोसले या विद्यार्थ्याने संविधानावर स्वरचित पोवाडा सादर केला. दि. १२ मार्च रोजी “जागर संविधानाचा” या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कलागुणांना वाव मिळावा यासाठी वेगवेगळे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले, स्वरचीत व संकलित कविता, नाट्य, मूक नाट्य, मुट कोर्ट, पोवाडा, एकांकिका अशा विविध कार्यक्रमातून संविधानाची जनजागृती करण्यात आली. आमचे प्रेरणास्थान मा. अॅड. श्री. संजय शिवाजीराव काळे साहेब यांची प्रेरणा कार्यक्रमाला लाभली. या कार्यक्रमाला अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. विलास कुलकर्णी, प्राचार्य प्रा. डॉ. महादेव वाघमारे, उपप्राचार्य प्रा. डॉ. रविंद चौधरी, कलाशाखाप्रमुख तसेच राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. अभिजित पाटील, वाणिज्यशाखा प्रमुख प्रा. डॉ. सतीश जाधव आदी. मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्र विभागप्रमुख प्रा. डॉ. अभिजित पाटील यांनी केले. सूत्रसंचालन कु. यास्मिन हवालदार तर आभार प्रा. कुणाल वानखेडे यांनी केले.
COMMENTS