प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट सर नारायणगाव वारुळवाडी येथील कोठारी मैदानात प्रथम क्रमांकासाठी विक्रमी एकावन्न हजार रुपये बक्षीसासह आयोजित श...
प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट सर
नारायणगाव वारुळवाडी येथील कोठारी मैदानात प्रथम क्रमांकासाठी विक्रमी एकावन्न हजार रुपये बक्षीसासह आयोजित श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब महाळुंगे पडवळ यानी आदिवासी युवकांसाठी आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेत बक्षीस वितरणास शिवसेना नेत्या प्रा सुरेखाताई निघोट, दादु कोठाळे,मनोज लोखंडें सह अनेक आदिवासी समाजाचे मान्यवर ऊपस्थित होते. स्पर्धेत पुणे,नगर,ठाणे जिल्ह्यातुन पन्नासवर संघ सहभागी झाले होते.
स्पर्धा ऊद्घाटन आंतरराष्ट्रीय मराठा महासंघ पुणे जिल्हाप्रमुख प्रा अनिल निघोट,नारायणगाव सरपंच बाबु पाटे यांनी केले,आठवडाभर चाललेल्या क्रिकेट स्पर्धेत भैरवनाथ क्रिकेट क्लब महाळुंगे पडवळ प्रथम,जय भवानी क्रिकेट क्लब शेलु द्वितीय, एंटिक इलेव्हन पिंपरवाडी त्रतिय,स्वर्गीय निरंजन देवकर चतुर्थ,के सी सी नारायणगाव पाचवा तर एम सी सी रेटवडी सहावा,मुन्ना इलेव्हन बोटा सातवा सिद्धिविनायक देशमुखवाडी आठव्या क्रमांकासह विजेते ठरले, ज्यात दोन लाखापर्यंत बक्षीसे होती.बक्षीस वितरण शिवसेना महिला आघाडी नेत्या व आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रा.सुरेखाताई निघोट, भारतीय विद्यार्थी सेना माजी आंबेगाव तालुका प्रमुख प्रा.अनिल निघोट,मनोज लोखंडे,दादु कोठाळे,माऊली कोकणे,चावंड चे सरपंच अनिल गुटे,भैरवनाथ क्रिकेट क्लब चे अध्यक्ष अक्षय काळे,पप्पु काळे, स्वप्नील मेंगाळ,पुंडलिक मराडे,राहुल जाधव, लक्ष्मण केदार, सुशांत जाधव,हर्षल वाजगे,स्वरांश मेंगाळ, सोनु केदार,अनिल घोगरे संकेत खाडे ऊपस्थित होते.
COMMENTS