सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना कारागृहात मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे. दोन गटात झालेल्...
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना कारागृहात मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे. दोन गटात झालेल्या राड्यानंतर ही मारहाण झाल्याचं कळतंय.
वाल्मिक कराड याने खोट्या गुन्ह्यात अडकवल्याच्या रागातून या तुरुंगातील एका आरोपीने वाल्मिक कराड आणि त्याचा साथीदार सुदर्शन घुले याला मारहाण केल्याचे कळते आहे.
बीडच्या जिल्हा कारागृहात आज सकाळी कैद्यांच्या दोन गटात वाद झाला होता. परळीतील महादेव गीते व सोनवणे नामक आरोपींच्या गटात हा वाद झाला होता. या वादात दोन्ही बाजूंनी शिवीगाळ आणि धक्काबुक्की झाली. मात्र कारागृहातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वाद निवळला.
COMMENTS