आपण देशात कुठेही गेलो तरी तात्काळ रोख रक्कम काढण्यासाठी हमखास एक मार्ग म्हणजे एटीएम. बाहेर असल्यावर तात्काळ पैशांची गरज असेल तर आपण एटीएमच...
आपण देशात कुठेही गेलो तरी तात्काळ रोख रक्कम काढण्यासाठी हमखास एक मार्ग म्हणजे एटीएम. बाहेर असल्यावर तात्काळ पैशांची गरज असेल तर आपण एटीएमचा मार्ग अवलंबवतो. मात्र आता हाच मार्ग खर्चिक होणार आहे.
कारण एटीएममधून पैसे काढताना काही शुल्क भरावे लागणार आहे. नेमके किती शुल्क भरावे लागणार? कधीपासून हे दर आकारण्यात येतील? जाणून घेऊया
ATM Withdrawal Fee Hike: आपण देशात कुठेही गेलो तरी तात्काळ रोख रक्कम काढण्यासाठी हमखास एक मार्ग म्हणजे एटीएम. बाहेर असल्यावर तात्काळ पैशांची गरज असेल तर आपण एटीएमचा मार्ग अवलंबवतो. मात्र आता हाच मार्ग खर्चिक होणार आहे. कारण एटीएममधून पैसे काढताना काही शुल्क भरावे लागणार आहे. नेमके किती शुल्क भरावे लागणार? कधीपासून हे दर आकारण्यात येतील? जाणून घेऊया नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून एटीएममधून पैसे काढण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या इंटरचेंज शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंटरचें शुल्क १७ रुपयांवरुन १९ रुपये करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. हा नवा बदल १ मे २०२५ पासून लागू होणार आहेत. देशांतर्गत वित्तीय आणि गैर वित्तीय व्यवहारांसाठी इंटरचेंज शुल्कात दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून खात्यातील शिल्लक रक्कम तपासण्यासाठी सहा रुपये शुल्क लागत होते. ते आता सात रुपये करण्यात आले आहे. हे शुल्क मोफत मासिक ट्रॉन्जेक्शनची मर्यादा संपल्यावर आहे. मेट्रो शहरात होम बँकेशिवाय इतर ठिकाणावरुन रक्कम काढण्यासाठी पाच ट्रॉन्जेक्शन दिले आहे. त्यापेक्षा जास्त झाल्यावर शुल्क लागते. नॉन मेट्रो शहरांसाठी ही मर्यादा तीन आहे.
एनपीसीआयनं १३ मार्चला जारी केलेल्या पत्रकानुसार गैर वित्तीय व्यवहारांसाठी ७ रुपयांचं इंटरचेंज शुल्क आकारलं जाणार आहे. हे इंटरचेंज शुल्क मायक्रो-एटीएम, इंटरऑपरेबल कॅश डिपॉझिट आणि आंतरराष्ट्रीय एटीएम व्यवहारांवर लागू नसेल. सध्या जे दर आकारले जातात ते कायम असणार असतात.
शिवाय , एटीएम कार्ड वापरासंदर्भातील नियम देखील बदलले जाणार आहेत. समजा एखाद्या बँक खातेदारानं त्याचं खातं ज्या बँकेत आहे त्या बँकेऐवजी दुसऱ्या बँकेच्या एटीएम सेंटरवरुन पैसे काढले तर, ठराविक व्यवहारानंतर शुल्क भरावं लागतं. सध्या दुसऱ्या बँकेच्या एटीएम सेंटरवरुन ५ वेळा मोफत पैसे काढता येतात. मात्र, आता ही संख्या ३ पर्यंत आणली जाणार आहे.लवकरच हा नियम लागू होईल.
COMMENTS