शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल क...
शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत 'तुमची औकत काय?', असा थेट सवाल केला आहे.
रत्नागिरीतील सभेत बोलताना त्यांनी 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी कमावले, तुमचं त्यात काहीही योगदान नाही. तुम्हाला सर्व काही आयतं मिळालं!' असा आरोप केला.
रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंच्या राजकीय निर्णयांवर टीका करत सांगितले की, 'शिवसेनाप्रमुख स्वतः मुख्यमंत्री होऊ शकले असते, पण त्यांनी तसं केलं नाही. मात्र, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद घेतलं आणि त्यामुळेच शिवसेना फुटली!'
त्यांनी पुढे सांगितले की, 'आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत दहा-पंधरा लोक आहेत, पण दोन वर्षांत तेही सोडून जातील. एक दिवस असा येईल की तुम्हाला हा देश सोडून लंडनला जावं लागेल. आम्हाला माहीत आहे, लंडन, अमेरिका आणि श्रीलंकेत तुमचं काय आहे. आम्ही ५० वर्ष मातोश्रीसोबत घालवली आहेत, आम्हाला तोंड उघडायला लावू नका!'
रामदास कदम यांनी ठाकरेंना इशारा देत सांगितले, 'एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या विरोधात बोलाल, तर त्याचा परिणाम भोगावा लागेल. तुम्ही शिवसेनेच्या वारशावर जगत आहात, पण आता तो वारसा शिंदे साहेब पुढे नेत आहेत.'
कदम यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाचे कौतुक करत सांगितले, 'मी अनेक वर्ष विधिमंडळात होतो, पण एवढ्या मेहनतीने काम करणारा मुख्यमंत्री मी पहिला नाही. त्यांनी दिवसरात्र मेहनत करून बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवले आहेत.'
या कार्यक्रमात माजी आमदार सुभाष बने (Subhash Bane), माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने (Rohan Bane), पराग बने (Parag Bane), माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक (Rajendra Mahadik), जिल्हा प्रमुख विलास चाळके (Vilas Chalke), माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रचना महाडिक (Rachana Mahadik) यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला.
रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत 'रश्शी जळाली पण पिळ जात नाही' असे म्हणत टोला लगावला. ते म्हणाले, 'महाराष्ट्राने तुम्हाला घरी बसवलं, तरी तुम्हाला कळत नाही. कितीही शिव्या द्या, कितीही आरोप करा, मी घाबरत नाही. माझ्या मागे लाडकी बहिण, लाडके शेतकरी आणि जनतेचं पाठबळ आहे.'
COMMENTS