राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरु होणार...
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरु होणार आहे, तर १० मार्च रोजी अर्थमंत्री अजित पवार महायुती सरकारमधील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे.
या अर्थसंकल्पात सरकार कोणत्या घोषणा करणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर लगेच नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन झाले. हे फडणवीस सरकारचे पहिले अधिवेशन होते. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर आता पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडणार आहे. राज्याच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला ३ मार्चपासून सुरुवात होणार आहे. अजित पवार १० मार्चला अर्थसंकल्प सादर करणार असून यात आगामी अर्थिक वर्षामध्ये महायुती सरकार कोणत्या नवीन योजना आणणार आणि खर्च काढणार याचा लेखाजोखा मांडणार आहे. याशिवाय सरकार लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना गूड न्यूज देण्याची शक्यता आहे.
लाडक्या बहिणींना मिळणार गूड न्यूज?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने गेल्यावर्षी जुलैमध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेअतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये लाभ दिला जात आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने सत्तेत आल्यास ही रक्कम २१०० रुपये करण्याचे अश्वासन दिले होते. त्यानंतर महायुतील प्रचंड बहुमताने सत्तेत आली तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात यासंदर्भात तरतुद केली जाईल असे म्हटले होते. त्यामुळे या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना गूड न्यूज मिळण्याची शक्यता आहे.
COMMENTS