१).उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली ...
१).उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या मेलमध्ये त्यांची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे.
हे धमकीचे ईमेल गोरेगाव आणि जेजे मार्ग पोलीस स्टेशन तसेच मंत्रालय (राज्य सचिवालय) यांना पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान या धमकीनंतर मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे.
२).पुढील ५ वर्षात २५ हजार नव्या बस खरेदी करणार - प्रताप सरनाईक
राज्य शासन दरवर्षी पाच हजार याप्रमाणे पुढील पाच वर्षात २५ हजार नवीन बसेस खरेदी करणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व आगारांना नवीन बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
सोलापूर विभागातील प्रत्येक आगारालाही लवकरच नव्या बस उपलब्ध करून दिल्या जातील. सध्या बार्शी आगाराला १० नव्या बसेस मिळाल्या असून अशाच उर्वरित ८ आगारांना देखील नवीन बसेस देण्यात येणार असल्याची ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
३). NEET परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय परदेशात mbbs करता येणार नाही - सर्वोच्च न्यायालय
लाखो भारतीय विद्यार्थी दरवर्षी NEET ची परीक्षा देऊन MBBS चा प्रवेश मिळवतात. काही विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जातात. अशा विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय विद्यार्थ्यांना कोणत्याही परदेशी संस्थेतून MBBS करण्यासाठी NEET UG परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे.
NEET परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय तो विद्यार्थी परदेशी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकणार नाही. एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
४). पीएम किसानच्या १९ व्या हप्त्याचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार वितरण.
पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचा माहे डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ कालावधीतील १९ वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक २४ फेब्रुवारी, २०२५ रोजी दुपारी ०२.१५ वा. ते ०२.३० वा. या कालावधीत भागलपुर, बिहार येथील समारंभात वितरीत होणार आहेत. हा कार्यक्रम देशामध्ये "किसान सन्मान समारोह" म्हणून सर्वदूर आयोजित करण्यात आलेला आहे.
COMMENTS