यवतमाळ : यवतमाळ येथील घाटंजी तालुक्यातील माणोली ते दहेगाव परिसरात किनवट एसटी बसचा आणि एका दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव एसटीने दुचाक...
यवतमाळ : यवतमाळ येथील घाटंजी तालुक्यातील माणोली ते दहेगाव परिसरात किनवट एसटी बसचा आणि एका दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव एसटीने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
विशेष बाब म्हणजे, या एसटी बसमध्ये तब्बल ८८ प्रवासी होते. सुदैवाने बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
असा झाला अपघात?
सदर एसटी बस किनवटवरून घाटंजी मार्गे यवतमाळकडे येत होती. चालकाचं नियंत्रण सुटल्याने समोर चालणाऱ्या दुचाकीला एसटीने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. एसटी बसमध्ये ८८ प्रवासी होते. अपघातात मृत झालेल्या दुचाकीस्वाराचं नाव नंदू चव्हाण असं असून तो जळका तालुक्यातील राळेगाव येथे वास्तव्यास होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
बसचा स्टेरिंग रॉड तुटल्याने अपघात
दरम्यान, काही दिवसांपूर्वी स्कूल बसच्या अपघाताची एक दुर्दैवी घटना घडली होती. उमरखेड तालुक्यातील दिवटीपिंपरी येथे शाळेच्या बसचा भीषण अपघात झाला होता. यामध्ये नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. या अपघातमध्ये अनेक विद्यार्थी देखील जखमी झाले होते.
बसचा स्टेरिंग रॉड तुटल्याने स्कूल बस झाडावर आदळली आणि हा भीषण अपघात झाला होता. ही बस वेल्फेअर इंग्लीश मीडियम स्कूलची असल्याचं सांगण्यात येत होतं.
COMMENTS