जुन्नर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जुन्नर तालुका यांच्या वतीने सोमवार दि. १० फेब्रुवारी २०२५ रोजी जुन्नर तहसील गेटबाहेर विविध मागण्यासाठी ध...
जुन्नर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जुन्नर तालुका यांच्या वतीने सोमवार दि. १० फेब्रुवारी २०२५ रोजी जुन्नर तहसील गेटबाहेर विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी १) मागासवर्गीय तसेच अनुसूचित जमाती यांच्या शेतजमिनीतून विना संमतीने रस्ता काढू नये असे असतानाही मौजे बोतार्डे येथे इनाम वर्ग ६ ब च्या जमिनीतून खोडसाळपणे रस्ता काढणाऱ्या यंत्रनेवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
२) मौजे बोतार्डे येथील आदिवासी समाजाच्या बेघर लोकांसाठी घरकुल योजना व्हावी याकरिता अनुसूचित जातीच्या शेतकऱ्याकडून शेतजमीन खरेदी खत करण्यात आली मात्र सदर शेतकऱ्याला ठरलेली रक्कम अदा करण्यात आली नाही त्यामुळे दोन्ही समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सदर खरेदी खत करणाऱ्यावर ऍट्रॉसिटी कायद्यानंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा.
३) पंतप्रधान आवास योजनेचा तालुक्यातील ग्रामपंचायतीनी अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना शासनाच्या यादीत समाविष्ट करून घेतले नाही तरी यात सुधारणा करावी.
४) तालुक्यातील दलित वस्त्यांना शासकीय योजनाचे लाभ मिळविण्यासाठी गतिमानता वाढवावी जेणेकरून सर्वांना लाभ मिळेल व सर्व प्रशासकीय यंत्रणा यांनी मागासवर्गीय कार्यकर्त्यांची महिन्यातून एक बैठक लावावी या व अशा मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
या आंदोलन प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक संभाजी साळवे, पोपटराव राक्षे आर. पी. आय तालुका अध्यक्ष, सुरेश खरात आर. पी. आय तालुका उपाध्यक्ष, संपत गायकवाड आर. पी. आय सचिव, गौतम लोखंडे आर. पी. आय. पुणे जिल्हा उपाध्यक्ष, मंगेश गायकवाड आर. पी. आय, वसंत साळवे, अनिल सोनवणे, दिपक सोनवणे, वैभव खरात, प्रतिक खरात, सुनील खरात, नवनाथ खरात, आनंद खरात, चंद्रकांत खरात, बाळू खरात, विजय पोटे, इंदुबाई खरात, यमुनाबाई खरात, मथुराबाई खरात, लीलाबाई सोनवणे आदि उपस्थित होते.
पुढील बातमी अपडेट होत आहे.
COMMENTS