देशाचे विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा कार्यकाळ आज (18 फेब्रुवारी) संपत आहे. अशातच आताा पुढील मुख्य निवडणूक आयुक्तांच्या न...
देशाचे विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा कार्यकाळ आज (18 फेब्रुवारी) संपत आहे. अशातच आताा पुढील मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
ज्ञानेश कुमार हे आता मुख्य निवडणूक आयुक्त असणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय समितीच्या बैठकीनंतर त्यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त तीन सदस्यीय समितीमध्ये कायदा मंत्री अर्जुन मेघवाल आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी कायदा मंत्री अर्जुन मेघवाल आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांच्या नावाची निवड केली. त्यानंतर सोमवारी रात्री कायदा मंत्रालयाने नवीन मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नावाची घोषणा करणारी नोटीस जारी केली. आता ते लवकरच राजीव कुमार यांची जागी घेणार आहेत.
कोण आहेत ज्ञानेश कुमार?
ज्ञानेश कुमार हे केरळ कॅडरचे 1988 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
ज्ञानेश कुमार आतापर्यंत निवडणूक आयुक्त म्हणून जबाबदारी पाहत होते.
ते सहकार मंत्रालयाचे सचिव होते आणि 31 जानेवारी 2024 रोजी निवृत्त झाले.
कलम 370 हटवण्यासारख्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग होता.
गृह मंत्रालय आणि संसदीय कामकाज मंत्रालयातही काम केले आहे.
ज्ञानेश कुमार यांची प्रशासकीय कारकीर्द दीर्घ आणि प्रभावी राहिली आहे.
ज्ञानेश कुमार यांचा कार्यकाळ 26 जानेवारी 2029 पर्यंत असेल.
मुख्य निवडणूक आयुक्त बनण्यासाठी अटी काय आहेत, किती पगार मिळतो?
कायद्यानुसार मुख्य निवडणूक आयुक्त होण्यासाठी उमेदवार हा भारत सरकारचा सचिव दर्जाचा अधिकारी असणे आवश्यक आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांचे वेतन सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांइतकेच असते.
मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ 6 वर्षे किंवा वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत असेल.
मुख्य निवडणूक आयुक्तांचे निवृत्तीचे वय 65 वर्षे आहे.
मुख्य निवडणूक आयुक्तांचे निवृत्तीचे वय 65 वर्षे आहे आणि निवडणूक आयुक्तांचे निवृत्तीचे वय 62 वर्षे आहे.
COMMENTS