कुमशेत, २७ फेब्रुवारी: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुमशेत येथे मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध ...
कुमशेत, २७ फेब्रुवारी: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुमशेत येथे मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध साहित्यिक उपक्रमांमध्ये सहभाग घेत मराठी भाषेच्या अभिमानाचा अनुभव घेतला.
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी बाल साहित्य दिंडी काढली. यात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दिंडीत विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्त्व दर्शवणारे फलक आणि पोस्टर हातात धरून घोषवाक्ये दिली.
मराठी भाषा गौरव दिनाच्या बाल सभेचे सूत्रसंचालन पुर्वा अनिल डोके (इ. ४ थी) हिने केले. सभेमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या साहित्यकृतींची सादरीकरणे केली.
श्रुती डोके, प्रज्वल नाईकवाडी, रिया दुधाळ, स्वरा डोके, वेदश्री, सानवी डोके – या बाल साहित्यिकांनी आपल्या स्वतःच्या कविता सादर केल्या.
पहिलीतील मुलांनी पाठ्यपुस्तकातील कवींच्या कविता तालासुरात गाऊन सादर केल्या.
आरोही भगत, जय डोके, तनुज डोके, रुद्र डोके – यांनी दैनिक अनुभव लिहून वाचून दाखवले.
ओवी डोके, साई डोके, स्वयंम डोके, पुर्वा डोके, प्रसाद डोके, श्रुती डोके, मानसी वाणी, देवांश डोके यांनी संवाद लिहून वाचून दाखवले.
आरुष डोके, भक्ती भास्कर, विराज वाणी, ईश्वरी शेलार – यांनी शुभेच्छापत्र लिहून सादर केली.
विद्यार्थ्यांनी निबंध लेखन, गोष्टी वाचन, संवाद वाचन केले.
मराठी भाषा कवी कट्यावर विद्यार्थी बसून पुस्तक वाचनाचा आनंद घेत होते.
काही विद्यार्थ्यांनी स्वतः साहित्य दिंडी तयार करून मराठी भाषेच्या गौरवाचा आनंद घेतला.
शाळेतील शिक्षक यशवंत घोडे सर यांनी मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जाबाबत माहिती दिली.
मराठी भाषेचा इतिहास आणि तिचे वैशिष्ट्ये स्पष्ट केली.
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (दिल्ली) याचा अनुभव विद्यार्थ्यांशी शेअर केला.
"माय मराठी" आणि "मराठी भाषा वाचवा" या त्यांच्या स्वतःच्या रचना सादर केल्या.
विद्यार्थ्यांना लेखनाची गोडी आणि भाषेच्या संवर्धनाची प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रज्वल नाईकवाडी (इ. ४ थी) या छोट्या बाल साहित्यिकाने आभारप्रदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रमात आनंदाने सहभाग घेतला आणि मराठी भाषेच्या समृद्धीबद्दल अभिमान व्यक्त केला.
या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची अभिरुची वाढली, लेखनाविषयी प्रेरणा मिळाली आणि भाषेच्या संवर्धनाचे महत्त्व पटले.
"मराठीचा गोडवा टिकवूया, भाषा समृद्ध करूया!"
"मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!"
COMMENTS