Majhi Ladki Bahin Yojna : महायुती सरकारच्या वतीने पुन्हा एकदा राज्यातील बहिणींना आनंदाची बातमी दिली आहे. दर महिन्याला मिळणारे दीड हजारांबरोब...
Majhi Ladki Bahin Yojna : महायुती सरकारच्या वतीने पुन्हा एकदा राज्यातील बहिणींना आनंदाची बातमी दिली आहे. दर महिन्याला मिळणारे दीड हजारांबरोबर आता आगामी होळी सणानिमित्त बहिणींना खास भेट दिली जाणार आहे.
त्यामुळे लाडक्या बहिणींच्या आनंदात आणखी भर पडणार आहे.
एकीकडे लाडक्या बहिणींच्या पात्र यादीची पडताळणी सुरू आहे. त्यातून अनेक महिलांचे नावे वगळली जात आहे. तर काही महिला स्वत:हून या योजनेतून बाहेर पडत आहेत. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता नक्की कधी पडणार याची चर्चा सुरू होती. अशातच, शासनाच्या वतीने आज किंवा उद्यापासून फेब्रुवारीचा हप्ता दिला जाणार आहे. तसेच लाडक्या बहिणींना होळीनिमित्त खास भेट दिली जाणार आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं महायुती सरकारने काय निर्णय घेतला.
महायुती सरकारकडून लाडक्या बहिणींवर विशेष लक्ष
महायुती सरकारने लाडक्या बहिणींवर लक्ष केंद्रीत केले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना परिवहन महामंडळाच्या बसेसमधून अर्ध्या तिकिटावर प्रवास करण्याची योजना आणली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना आणत 1500 रुपये महिलांच्या खात्यात देणे सुरु केले. त्यामुळे महिलांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरुन मतदान केले.
आता महायुतीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारनेही महिलांवर लक्ष केंद्रीत केले आहे. होळीच्या निमित्ताने रेशन दुकानातून साड्यांचे वाटप होणार आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना साड्या दिल्या जाणार आहे. त्यासंदर्भातील आदेश राज्याच्या पुरवठा विभागाने काढले आहेत.
रेशन दुकानातून मिळणार महिलांना साड्या
लाडक्या बहिणींना साडी भेट देण्याचा निर्णय झाल्यानंतर राज्य यंत्रमाग महामंडळाद्वारा अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांच्या यादीनुसार साड्यांचे गठ्ठे तयार केले. प्रत्येक तालुक्यातील रेशन दुकानात पोहोचवण्यात येणार आहेत. होळीपर्यंत प्रत्येक लाभार्थी कुटुंबांना एक साडी दिली जाणार आहे.
कसा मिळणार साड्यांचा लाभ, काय करावे लागेल?
लाभार्थी महिलांनी रेशन दुकानात जाऊन ई-पॉस मशीनवर अंगठा ठेवल्यानंतर त्यांना एका कार्डवर एक साडी दिली जाणार आहे. राज्याच्या सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागातर्फे यावर्षीही अंत्योदय गटातील प्रत्येक शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत साडी देण्यात येणार आहे.
फडणवीस सरकारच्या वतीने हा निर्णय घेण्यात आल्याने महिलांना आनंदाची गोष्ट आहे.
COMMENTS