नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था परळ मुंबई यांच्या सहयोगाने भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश आयोजित नवीन लेबर कोड आणि ...
नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था परळ मुंबई यांच्या सहयोगाने भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश आयोजित नवीन लेबर कोड आणि भारतीय मजदूर संघाच्या सेमिनार चे उद्घाटन आज गुरूवार दि.6 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता ना.मे.लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था सभागृह परळ, मुंबई येथे संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.नामदार ऍड.श्री.आकाशजी फुंडकर कामगार मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते झाले
यावेळी प्रमुख वक्ते मा.श्री.ऍड राजबिहारी शर्मा (जयपुर) अ.भा. उपाध्यक्ष भा.म.संघ, सी.वी.राजेश क्षेत्र संघटन मंत्री भा.म.संघ, ऍड.अनिल ढूमणे अध्यक्ष भा.म.संघ महाराष्ट्र प्रदेश, बाळासाहेब भुजबळ संघटन मंत्री, निमंत्रक डॉ.पी एम कडुकर, संचालिका रोशनी कदम-पाटील, किरण मिलगीर महामंत्री,भा.म.संघ महाराष्ट्र प्रदेश उपस्थित होते.
नवीन लेबर कोड बाबतीत विविध स्तरावर चर्चा चालू आहेत या बाबतीत भारतीय मजदूर संघां सोबत सविस्तर चर्चा करून धोरण निश्चीत करणार असल्याचे प्रतिपादन मा ना कामगार मंत्री यांनी केले आहे.
लेबर कोड बाबतीत वेतन कोड व सामाजिक सुरक्षा कोड मुळे सर्व स्तरावरील कामगारांना वेतन सुरक्षा, किमान वेतन व सामाजिक सुरक्षा मधील भविष्य निर्वाह निधी, कामगार वीमा योजना, ग्रजुईटी च्या बाबतीत असंघीटत व असंघीटत क्षेत्रातील कामगारांना लाभ मिळतील त्याची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी अशी भुमिका भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री अनिल ढुमणे यांनी व्यक्त केले आहे.
औद्योगिक संबंध कोड व व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणी कार्यस्धीती कोड च्या मध्ये काही सुधारणा,तरतूदी मध्ये सरकारने बदल करणे आवश्यक आहे या मुळे औद्योगिक व सामाजिक शांतता धोक्यात येऊ शकते. औद्योगिक क्षेत्रातील 80% कामगार कायद्याच्या तरतूदी च्या बाहेर जातील. ले ऑफ , कामगार कपात मध्ये नुकसान भरपाई मिळु शकणार नाही.
औद्योगिक संबंध संहिता मध्ये इंडस्ट्रीज या शब्दाची व्याख्या संकुचित केली आहे. माॅडेल स्टँडींग ऑडर्स लागु होण्यासाठी कामगार संख्या 50 वरून 300 पर्यंत वाढविली त्यामुळे देशातील 70 % उद्योगांमध्ये कायदा व नियमच नसलेले क्षेत्र तयार होईल. फिक्सटर्म एम्प्लॉयमेंट मुळे कामगारांना कायम स्वरूपी नोकरीचा दर्जा मिळणार नाही. संपाबाबतीत अधिकार अधिकारावर मर्यादा आली आहे. त्यामुळे या बाबतीत भारतीय मजदूर संघाचा विरोध असुन या बाबतीत संघाने सरकार ला दिलेल्या सुधारणा बाबतीत सकारात्मक भुमिका घेवून कामगारांना न्याय द्यावा असे मनोगत राज बिहारी शर्मा यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र प्रदेशाच्या विविध जिल्ह्यातील विविध उद्योग व महासंघाचे प्रदेश पदाधिकारी या सेमिनारसाठी उपस्थित होते.
या वेळी महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांचे महत्वपूर्ण प्रश्नांवर निवेदन दिले, या बाबतीत लवकरच मिटींग आयोजित करून कामगारांना न्याय दिला जाईल असे मा ना आकाशजी फुंडकर यांनी दिले आहे. विधानसभा आचारसंहितेचे काळात बंद केलेली बांधकाम कामगारांची ऑन लाईन नोंदणी भारतीय मजदूर संघाच्या मागणी नुसार सर्वा साठी सुरू केल्या बद्दल बांधकाम कामगार महासंघाचे पदाधिकारी यांनी सत्कार करून धन्यवाद व्यक्तकेले आहे.
प्रश्नोत्तरे होवून मुंबई जिल्हा सेक्रेटरी संदीप कदम यांनी आभार प्रदर्शन केले आहे .
COMMENTS