प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट सर जुन्नर दि.२७ फेब्रुवारी संपुर्ण विश्वाचे आराध्यदैवत छत्रपती शिवरायांचा जन्मदिन नुकताच शिवनेरी किल्ला व सर्...
प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट सर
जुन्नर दि.२७ फेब्रुवारी संपुर्ण विश्वाचे आराध्यदैवत छत्रपती शिवरायांचा जन्मदिन नुकताच शिवनेरी किल्ला व सर्वत्र साजरा झाला, दरवर्षीप्रमाणेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे अंतर्गत डॉ. मुमताज अहमद खान शिक्षणशास्र महाविद्यालय मंचर यांच्यावतीने आज बुधवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी विशेष उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म स्थान असलेल्या किल्ले शिवनेरी परिसराची स्वच्छता या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी विद्यार्थीशिक्षक, प्राध्यापक सहभागी झाले होते या उपक्रमाचे नियोजन समाजसेवा विभाग प्रमुख प्रा.जाधव कैलास यांनी केले होते. वेळी महाविद्यालय विद्यालय प्राचार्य अनंत बोरकर प्रा. अनिल निघोट प्रा.अशिर शेख प्रा.संदीप ढोकणे उपस्थित होते तसेच उपक्रमाच्या निम्मिताने जितेंद्र बिडवई संस्थापक डिसेंट फाउंडेशन पुणे मा.अध्यक्ष - श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट , गोळेगाव,सचिव जुन्नर पर्यटन विकास संस्था,संचालक महाराष्ट्र राज्य द्राक्ष उत्पादक संघ ,पुणे
तसेच प्रकाशशेठ ताजने उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर आणि आदिनाथ चव्हाण व संचालक - डिसेंट फाउंडेशन पुणे
चेअरमन - शिवकार्य नगरी सह.पतसंस्था जुन्नर तसेच गणेश सूर्यवंशी सदस्य -डिसेंट फाउंडेशन पुणे व योगेश वाघचौरे
समन्वयक - डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्या वतीने अल्पोपहार व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी किल्ले शिवनेरीचे पावित्र्य जपण्यासाठी विदयार्थीशिक्षकांनी परिसरातील कचरा गोळा करुन ऐतिहासिक स्थळाचे दर्शन घेतले,व शिव जन्मभूमि प्रत्येक वर्षी स्वच्छता मोहीमेस येण्याचा मनोदय व्यक्त केला.
COMMENTS