सूर्योदय युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या विविध पदांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये, श्री संकेत संजय निवडुंगे - प्रदेश उपाध्यक्ष, श्...
सूर्योदय युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या विविध पदांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये, श्री संकेत संजय निवडुंगे - प्रदेश उपाध्यक्ष, श्री सुनील रमेश पगार , प्रदेश सचिव, सौ-स्वाती सत्यवान गायकवाड, प्रदेश खजिनदार, श्री अक्षय कुऱ्हाडे - प्रदेश सहखजिनदार, तसेच सदस्य पदी - प्रणय कांबळे, सतीश कडवं यांची नियुक्ती करण्यात आली असून सूर्योदय युवा प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सत्यवान गायकवाड यांनी सर्व नियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती केली.
भविष्यात संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रा मध्ये संस्थेच्या माध्यमातून कार्य केले जाणार असून भविष्यात विविध उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील गरजू पर्यंत पोहचण्याचा मानस असल्याचे संस्थेचे अध्यक्ष श्री सत्यवान गायकवाड यांनी सांगितले.
तर, येणाऱ्या काळात महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून तालुक्यातून पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून याबाबत, मोर्चे बांधणी करण्यासाठी सत्यवान गायकवाड आणि नवनियुक्त पदाधिकारी लवकरच महाराष्ट्र भर दौरा करून जे नागरिक संस्थेसोबत सामाजिक क्षेत्रात कार्य करण्यास इच्छुक आहे. त्यांची भेट घेऊन महाराष्ट्रभर संस्थेच्या माध्यमातून कार्य केले जाणार असल्याचेही सांगण्यात आले.
महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा तसेच, तालुक्यातून विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करण्यास इच्छुक असणाऱ्या नागरिकांनी संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
COMMENTS