Shivbhojan Thali: राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे (Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana) अर्थसंकल्पीय तिजोरीवर भार वाढला आहे. यामुळे...
Shivbhojan Thali: राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे (Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana) अर्थसंकल्पीय तिजोरीवर भार वाढला आहे. यामुळे अनेक योजना बंद होण्याची शक्यता आहे. राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, दोन लाख कोटींहून अधिक तूट आहे.
त्यामुळे ही भरून काढण्यासाठी शिवभोजन थाळी (Shivbhojan Thali) व आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) यांसह इतर योजना बंद करण्याच्या विचारात राज्य सरकार असल्याचे म्हटले जात आहे. लवकरच राज्याचे अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने विविध विभागनिहाय बैठकी आयोजित करण्यात येत आहेत. त्या मध्ये इतर योजना बंद करण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या अनेक योजनांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे. एक लाख कोटी रुपयांची तूट भरुन काढण्यासाठी शिवभोजन थाळी व आनंदाचा शिधा या योजना बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
शिवभोजन थाळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं सरकार असताना सुरु करण्यात आली होती. त्यावेळी छगन भुजबळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते. त्यामुळं एक लाख कोटींची तूट भरुन काढली तर गाडा सुरळीत चालू शकतो, असं अर्थमंत्र्यांचं म्हणनं आहे. शिवभोजन थाळीचे दिवसाचे लाभार्थी १९०००० आहेत. या योजनेसाठी वार्षिक खर्च २६३ कोटी रुपये लागतात. त्यामुळं ही योजना बंद करावी का अशी चाचपणी सुरु आहे. आनंदाचा शिधा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरु करण्यात आली होती. दिवाळी, शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्यात येत आहे. आनंदाचा शिधा म्हणून चार वस्तू १०० रुपयात दिल्या जातात. बाजारात याची किंमत ५०० रुपये इतकी आहे. त्यामुळं उरलेली रक्कम राज्य सरकार आपल्या अनुदानातून भरत होतं. या दोन्ही योजना बंद करण्याची वेळ येते की काय अशी चर्चा आहे. अर्थमंत्र्यांनी काही आढावा बैठका घेतलेल्या आहेत. त्यामध्ये दोन्ही योजना बंद करायच्या का अशी चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितेलं आहे. यापूर्वी शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा योजना बंद करावी का अशा चर्चा झाल्या होत्या तेव्हा विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. आता अर्थसंकल्प सादर होणार आहे त्यामुळं या योजना बंद करायच्या का अशा चर्चा सुरु आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री Ajit Pawar लाडकी बहीण योजनेला केंद्रस्थानी ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे त्यामुळे त्याचा फटका इतर योजनांना पडणार आहे.
कंत्राटदारांचं ८९ हजार कोटी रुपयांची थकबाकी असल्यानं आंदोलन सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा योजने बाबत काय निर्णय होतो ते पाहावं लागेल. दरम्यान, अर्थसंकल्पासाठी घेण्यात येणाऱ्या शिवभोजन थाळी बंद करु नका अशी मागणी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
COMMENTS