लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महिला फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होत्या. दरम्यान, आता हे पैसे लवकरच महिलां...
लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महिला फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होत्या. दरम्यान, आता हे पैसे लवकरच महिलांना मिळणार आहे. आता पुढच्या आठ दिवसांत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.
फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आठ दिवसांत जमा होतील, असं अजित पवारांनी सांगितलं होतं. दरम्यान अजूनही पैसे जमा झाले नाहीत. मात्र, आता ८ दिवसांत नक्कीच महिलांना पैसे मिळणार आहेत.
फेब्रुवारी महिना हा २८ दिवसांचा आहे. त्यामुळे पुढच्या आठ दिवसांत महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा केले जातील. मागील तीन महिन्यांपासून शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जात आहे. या महिन्यातही शेवटच्या आठवड्यात पैसे जमा करतील.
मार्च महिन्यात ३ तारखेला राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. त्याआधी कदाचित महिलांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची तपासणी सुरु आहे. अर्जांची पडताळणी झाल्यानंतरच महिलांना पैसे दिले जाणार आहेत. यासाठी अजून काही दिवस लागू शकतात. त्यामुळे आता पैसे कधीपर्यंत येणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
विधानसभा निवडणूकीपूर्वी लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले जात होते. विधानसभा निवडणूका होऊन तीन महिने झाले आहेत तरीही लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळाले नाहीत. हे पैसे कदाचित राज्याच्या अर्थसंकल्पानंतर दिले जाऊ शकतात. अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार याबाबत मोठी घोषणा करु शकतात. या अर्थसंकल्पानंतर कदाचित २१०० रुपये दिले जाऊ शकतात.
COMMENTS