प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले ( सर ) जुन्नर . जेएसजी एज्युकॉन पुणे संस्थेकडून श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील अकरावी मध्ये शिकणाऱ्या गरीब ...
प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले ( सर )
जुन्नर . जेएसजी एज्युकॉन पुणे संस्थेकडून श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील अकरावी मध्ये शिकणाऱ्या गरीब व होतकरू विद्यार्थी व विद्यार्थीनींना मोफत वीस सायकलचे वाटप करण्यात आले . पुणे येथील सौ भारती स्नेहल वसानी व जेएससी एज्युकॉन संस्थेचे अध्यक्ष कामेश शहा, खजिनदार सुनील शहा, सदस्य राजकुमार जैन व समन्वयक प्रा अशोक पाटील यांचे विशेष सहकार्य या उपक्रमास लाभले .महाविद्यालयात दुर्गम भागातून येणाऱ्या व एसटीची सोय नसणाऱ्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वीस सायकलचे वाटप जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड संजय शिवाजीराव काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष अँड निवृत्ती काळे , विश्वस्त अशोक काळे ,अनिलकाका जोगळेकर , अध्यक्ष प्रतिनिधी प्रा विलास कुलकर्णी , प्राचार्य डॉ महादेव वाघमारे , उपप्राचार्य डॉ रविंद्र चौधरी , कनिष्ठ महाविद्यालयाच्या समन्वयक प्रा प्रतिभा लोढा , पर्यवेकक प्रा समीर श्रीमंते , प्रबंधक मनिषा कोरे व इतर मान्यवर तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड संजयराव काळे म्हणाले 'जेएसजी एज्युकॉन संस्थेचे कार्य कौतुकास्पद असून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या उपक्रमाचा नक्कीच फायदा होईल .
जेएससी एज्युकॉन संस्थेमार्फत श्री शिव छत्रपती महाविद्यालयात वीस विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करताना मान्यवर मंडळी
COMMENTS