नवी दिल्ली : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोठा घोळ झाला आहे. या निवडणुकांचा अभ्यास केला असता यातमध्ये अनेक धक्कादायक प्रकार घडले आहेत. पाच ...
नवी दिल्ली : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोठा घोळ झाला आहे. या निवडणुकांचा अभ्यास केला असता यातमध्ये अनेक धक्कादायक प्रकार घडले आहेत. पाच महिन्यातच मोठ्या संख्येने मतदार कसे वाढले ?
असा सवाल करत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला आहे. आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांनी अनेक खुलासे केले आहेत. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या.
यावेळी राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्राच्या निवडणुकीसंदर्भात आम्ही सविस्तर अभ्यास केला. यामध्ये आम्हाला या निवडणुकीत हेराफेरी झाल्याचे निर्देशनात आले. महाराष्ट्राच्या मतदारस याद्यांमध्ये आम्हाला अनेक अनियमितता दिसून आली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान ३९ लाख मतदार वाढले. असा दावाही राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच शिर्डीत एकाच कॉलीनीत मतदार वाढले असल्याचेही त्यांनी सांगितले.
पाच महिन्यातच इतके मतदार कसे वाढले ? महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार कसे ? आम्हाला फोटोसह मतदार याद्या द्या. अशी मागणीही त्यांनी केली. याबाबत आता तीन मोठे पक्ष निवडणुक आयोगाकडे मतदार याद्या मागत आहेत. काही तरी चूक असल्यानं निवडणूक आयोगाकडून आम्हाला उत्तर दिली जात नाहीत. असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
COMMENTS