मुंबई : दहावीमध्ये शिकणाऱ्या 16 वर्षीय मुलाने वर्गातल्याच मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रका...
मुंबई : दहावीमध्ये शिकणाऱ्या 16 वर्षीय मुलाने वर्गातल्याच मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
याप्रकरणी नवी मुंबईच्या रबाळे पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरोधात पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
अल्पवयीन मुलगा आणि पीडित मुलगी दोघेही एकाच शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत आहेत. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर मुलाने मागच्या वर्षी जुलै महिन्यात वर्ग मैत्रिणीला घणसोलीतल्या आपल्या दुसऱ्या घरात भेटायला बोलावले आणि तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले. जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये या दोघांमध्ये लैंगिक संबंध सुरू होते, त्यामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली. मुलीच्या पोटात दुखायला सुरूवात झाल्यामुळे आईने तिला महापालिकेच्या रुग्णालयात तपासणीसाठी नेलं, तेव्हा मुलगी 21 आठवड्यांची गरोदर असल्याचे समजल्यानंतर आईला धक्काच बसला. आईने मुलीकडे विचारपूस केली असता वर्गातल्या मित्रानेच आपल्यावर अत्याचार केल्याची माहिती तिने दिली.
दरम्यान, मुलीने सगळा प्रकार सांगितल्यानंतर आईने आपल्या मुलीसह रबाळे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS