९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथील संमेलन संपन्न होऊन परतीला येत असताना एक ऐतिहासिक वाढदिवसाच्या निमित्ताने श्री जे आर गुंज...
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथील संमेलन संपन्न होऊन परतीला येत असताना एक ऐतिहासिक वाढदिवसाच्या निमित्ताने श्री जे आर गुंजाळ कॉलेज आळेफाटा येथील जितेंद्र कांबळे यांचा वाढदिवस अतिशय आनंदात साजरा करण्यात आला.
असा अनोखा वाढदिवस पहिल्यांदा चालत्या फिरत्या रेल्वेमध्ये साजरा करण्यात आला याबद्दल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शरद गोरे सर, व डॉ विजय पोपेरे सर, सुप्रसिद्ध कवयित्री, वीणा व्होरा, जिल्हा परिषद शिक्षक यशवंत घोडे सर, सुप्रसिद्ध कवी लेखक माणिकराव गोडसे, लोकमत पत्रकार नितीन पाटील सर, प्रसिद्ध कलाकार, अभिनेता अमोल सर, फुलचंद नागटिळक सुप्रसिद्ध नाटककार नटसम्राट, सुवर्णा तेली कवयित्री सांगोला, आदेश फुलगे, यांनी कांबळे यांना काव्यातून शुभेच्छा देऊन एक ऐतिहासिक वाढदिवस साजरा केल्याचं यावेळी कवी यांनी सांगितले.
चालत्या फिरत्या ट्रेनमध्ये जितेंद्र कांबळे सर यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने आगळा वेगळा वाढदिवस हा कवी साहित्यिक यांच्या माध्यमातून कवितेतून साजरा करण्यात आला.
यावेळी जितेंद्र कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले व वाढदिवस संपन्न झाला.
COMMENTS