शिवनेरी किल्ल्यावर शिव जन्मस्थळाजवळ शिवभक्तांवर मधमाशांचा हल्ला झाला असून 10 ते 15 शिवभक्त जखमी झाले आहेत. जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयामध्...
शिवनेरी किल्ल्यावर शिव जन्मस्थळाजवळ शिवभक्तांवर मधमाशांचा हल्ला झाला असून 10 ते 15 शिवभक्त जखमी झाले आहेत. जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे शिवनेरीवरील शिवजन्मोत्सव कार्यक्रम संपवून निघून गेल्यावर हा प्रकार घडला असल्याची माहिती समुदाय आरोग्य अधिकारी श्रवण राऊत यांनी दिली.
ते म्हणाले की, शिवनेरी किल्ल्यावरचा मुख्य कार्यक्रम झाल्यानंतर मान्यवर निघून गेल्यावर एक तासानंतर हत्ती हौदाजवळ मोहळाच्या माशा अचानक वाढल्या. कडेलोटच्या दिशेने ह्या माशा आल्याचे समजले. या माशांचा हल्ला झाल्यावर शिवभक्त सैरावैरा पळत सुटले. आरोग्य पथक त्या ठिकाणी होते. या माशांनी या पथकावरही हल्ला केला.
मधमाशांचे हल्ल्यामध्ये पंधरा ते वीस लोक जखमी झाले आहेत. कुठल्यातरी शिवभक्ताने कडेलोटच्या बाजूने खोडसाळपणा करून त्या माशांना दगड मारला असावा म्हणून माशांनी हल्ला केला असावा अशी शंकाही आरोग्य अधिकारी श्रवण राऊत यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान मधमाशांनी हल्ला केलेल्या शिवभक्तांवर जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
COMMENTS