संपादक : प्रा. सतिश शिंदे नारायणगाव दि.२४ फेब्रुवारी आजपासून सुरू झालेल्या भैरवनाथ क्रिकेट क्लब महाळुंगे पडवळ यांनी नारायणगाव वारुळवाडी ...
संपादक : प्रा. सतिश शिंदे
नारायणगाव दि.२४ फेब्रुवारी
आजपासून सुरू झालेल्या भैरवनाथ क्रिकेट क्लब महाळुंगे पडवळ यांनी नारायणगाव वारुळवाडी येथील कोठारी मैदानात आदिवासींसाठी एकावन्न हजार रुपयांच्या पहिल्या बक्षिस व करंडक, ट्रॉफी सह भव्य क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलं आहे, ज्यात विक्रमी पन्नास संघ सहभागी झाले आहेत.
स्पर्धेचे ऊद्घाटन नारायणगाव चे सरपंच बाबु पाटे,आणि स्वाभिमानी मराठा महासंघाचे जिल्हाप्रमुख प्रा. अनिल निघोट यांचे शुभहस्ते पार पडले दोघांनीही स्पर्धेत सहभागी संघाच्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
या संघांमध्ये एन सी सी कडाळवाडी,बीसीसी अलदरे जुन्नर, न्यु स्टार कोरेगाव, मुन्ना इलेव्हन बोटा,शिवनेर सोमतवाडी सुरसंगम नारायणगाव,सायगाव चा वेताळेश्वर तसेच सिन्नर, संगमनेर, खेड,आंबेगाव ,मावळ तालुक्यातुन क्रिकेट संघ सहभागी झाले आहेत
स्पर्धा आयोजक भैरवनाथ क्रिकेट क्लब महाळुंगे पडवळ चे अक्षय काळे,पप्पु काळे,अंकुश जाधव ,राहुल जाधव, लक्ष्मण केदार, पुंडलिक मराडे,स्वप्नील मेंगाळ यांनी ऊत्तम नियोजन केले असुन प्रसिद्ध खेळाडू जयेश, विनोद शेटे उपस्थित होते. तसेच नारायण भांड,नारायण भालेकर व पंच स्वप्नील मेंगाळ,मनोज लोखंडे काम पहात आहेत. स्पर्धा ऊत्साहात सुरु झाली असुन कोण विजयी ठरतो याची ऊत्सुकता आहे.
COMMENTS