कुमशेत (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा):राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुमशेत येथे विविध शैक्षणिक उपक्रमांचे आ...
कुमशेत (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा):राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुमशेत येथे विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात बालसभा, विज्ञान प्रदर्शन, निबंध लेखन, चित्रकला, घोषवाक्य लेखन, तसेच कविता गायन यांसारख्या विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला.
शाळेतील विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनामध्ये विविध प्रयोग सादर करून विज्ञानाच्या गूढ गोष्टी उलगडण्याचा प्रयत्न केला. काही विद्यार्थ्यांनी चंद्रयान-3, अग्निबाण आणि अन्य वैज्ञानिक उपकरणांचे चित्र रंगवून आपली सर्जनशीलता सादर केली. तसेच विविध विज्ञान प्रकल्प आणि प्रतिकृती तयार करून विज्ञानाच्या विविध संकल्पनांचे सादरीकरण करण्यात आले.
जय डोके – पाण्यातील मोटर
स्वयंम डोके – पाण्यातील रांगोळी
प्रसाद डोके – पाण्यावर तरंगणारी आग
तनुज डोके – मेणबत्ती विझते
विराज वाणी – पाण्यातील कागद
आरुष डोके – प्रतिकृती
प्रज्वल नाईकवाडी – पाण्यातील रंग मिश्रण
साई डोके – बाटलीत धूर
अथर्व डोके – रंग तपकिरी
शंतनु डोके – कागद तुकडे चुंबकीय कण
सानवी डोके व भक्ती भास्कर – पाणी पृष्ठभाग
श्रुती डोके – मिनी इनव्हर्टर
रिया डोके – फेसाचे फुगे
ओवी डोके – तरंगणारे लिंबू
मानसी वाणी – पाण्याचा पृष्ठभाग
स्वरा व साई डोके रंगांची किमया
पूर्वा डोके – पाण्यात हवा
तसेच विद्यार्थ्यांनी अग्निबाण प्रतिकृती, होड्या, विमान आणि घराच्या प्रतिकृती तयार करून विज्ञान आणि अभियांत्रिकी यांचा समतोल कसा साधता येतो हे दाखवून दिले.
शास्त्रज्ञांविषयी माहिती आणि विज्ञानाचे फायदे
कार्यक्रमादरम्यान श्याम लोलापोड सर यांनी भारतीय शास्त्रज्ञांचे योगदान समजावून सांगितले. त्यांनी डॉ. सी. व्ही. रमण, ए. पी. जे. अब्दुल कलाम, होमी भाभा, विक्रम साराभाई आणि अन्य भारतीय शास्त्रज्ञांच्या कार्याविषयी सखोल माहिती दिली.
तसेच यशवंत घोडे सर यांनी काही प्रात्यक्षिके सादर करून विज्ञानाचे जीवनातील फायदे समजावले. त्यांनी "जग बदलले शोधांनी" ही स्वरचित कविता सादर करून विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली.
विद्यार्थ्यांनी "भारतीय स्वदेशी तंत्रज्ञान", "मेक इन इंडिया", "जय विज्ञान जय तंत्रज्ञान", "विज्ञान शाखा उघडल्या, अंधश्रद्धा गाडल्या" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. विज्ञानाच्या मदतीने अंधश्रद्धा आणि गैरसमज दूर करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळाली.
या विज्ञानदिन कार्यक्रमात पालक, शिक्षक आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शा. स. अध्यक्ष चेतन भगत
उपाध्यक्ष अनिल डोके
हरिभाऊ डोके
धनंजय डोके
निलेश डोके
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रुती डोके होत्या.
सुत्रसंचालन प्रज्वल नाईकवाडी याने केले, तर शेवटी पूर्वा डोके हिने आभारप्रदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला. विज्ञानाची महती, त्याचा आपल्या दैनंदिन जीवनातील उपयोग, आणि भारतीय संशोधनाची ताकद याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले, त्यांना विज्ञानाची गोडी लागली आणि अंधश्रद्धा व गैरसमज दूर करण्याची प्रेरणा मिळाली.
"विज्ञानाशिवाय प्रगती नाही, संशोधनाशिवाय नवीन जग निर्माण होत नाही!"
COMMENTS