प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट सर पेठ तालुका आंबेगाव येथील गुणवत्तेच्या बाबतीत अग्रभागी असणार्या श्री वाकेश्वर विदयालयात मंचर च्या डॉ.एम ए खा...
प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट सर
पेठ तालुका आंबेगाव येथील गुणवत्तेच्या बाबतीत अग्रभागी असणार्या श्री वाकेश्वर विदयालयात मंचर च्या डॉ.एम ए खान शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष विदयार्थीशिक्षकांच्या छात्रसेवेस प्रारंभ झाला असुन प्राचार्य बी.डी.धुमाळ व पर्यवेक्षक संजय पवळे संजय पवळे सर यांनी सर्वांचे स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी संजय पवळे यांनी छात्रसेवेस आलेल्या विदयार्थीशिक्षकांनी देश आणि समाजसेवा घडवणारे गुणवान विद्यार्थी घडवावेत असे आवाहन करुन स्वतःच्या पायावर ऊभे रहातील असे स्वाभिमानी विदयार्थी घडवण्याचे आवाहन केले. तर विभागप्रमुख प्रा अनिल निघोट यांनी आंबेगाव तालुक्याचे भुषण, स्कॉलरशिप, नवोदय तसेच दहावी, बारावीत गुणवत्ता यादीत अनेक विद्यार्थी येणारे विदयालय म्हणुन नावलौकिक असणारे श्री वाकेश्वर विद्यालय पेठ ,येथे छात्रसेवेस असणारे येथील विदयार्थी सगळेच भाग्यवान असुन छात्रसेवा ही एक सुवर्णसंधी असुन प्रत्येकाने विदयार्थीप्रिय शिक्षक व्हावे अशा भावी शिक्षकांना सदिच्छा दिल्या तर मार्गदर्शक प्रा. शिल्पा खराडे यांनी विदयार्थीशिक्षकांनी आपले अध्यापन विदयार्थीकेंद्रीत व आनंददायी शिक्षणातुन विदयार्थ्यांची मने जिंकुन अध्यनात गोडी वाढेल ,सतत प्रेरणा प्रोत्साहन देऊन त्यांना जीवनोपयोगी शिक्षण दयावे आशा सुचना दिल्या.
यावेळी शिक्षकव्रुंद व विद्यार्थीशिक्षक निलोफर मोमीन, स्वाती शिंदे, आरती भागडे,आस्मा चाऊस, बीबीमरीयम सय्यद, देसले,साबळे सविता ,इनामदार आस्मा,सोनवणे प्रिया ,कुंभार वर्षा ,कापडणीस म्रुणाली,कंठाळे सारीका,कड स्नेहा, ढमाले अनुराधा हे विद्यार्थीशिक्षक छात्रसेवेसाठी सहभागी झाले आहेत .
COMMENTS