प्रतिनिधी - प्रा. प्रविण ताजणे सर डिसेंट फाउंडेशन पुणे ,हाय स्पीड स्किल हब जुन्नर व राध्येशाम दिव्यांग सशक्तीकरण केंद्र यांच्या संयुक्त विद...
प्रतिनिधी - प्रा. प्रविण ताजणे सर
डिसेंट फाउंडेशन पुणे ,हाय स्पीड स्किल हब जुन्नर व राध्येशाम दिव्यांग सशक्तीकरण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने चाळीस दिवसीय मोफत शिवणकला वर्ग आयोजित करण्यात आला होता. सत्तर महिलांनी या प्रशिक्षण वर्गात सहभाग घेतला होता .त्याचा समारोप आज करण्यात आला . यावेळी सर्व महिलांना प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले . अनेक महिलांनी यावेळी आपली मनोगते व्यक्त केली . आता आम्ही स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो आम्ही स्वतःचा व्यवसाय करू शकतो अशी भावना यावेळी महिलांनी व्यक्त केली. पुढील सत्तर महिलांसाठीचा प्रशिक्षण वर्ग देखील लवकरच सुरु करणार असल्याचे यावेळी जितेंद्र बिडवई यांनी सांगितले .
यावेळी डिसेंट फाउंडेशन चे संस्थापक जितेंद्र बिडवई ,सचिव डॉ.एफ. बी. आतार ,संचालक आदिनाथ चव्हाण ,हाय स्पीड स्किल हब चे संस्थापक प्रा.दिलीप भगत , राधेश्याम संस्थेचे दीपक चव्हाण ,अरुण शेरकर ,प्रशिक्षक छाया सिरसोदे आदी मान्यवार व महिला भगिनी उपस्तित होत्या.
COMMENTS