प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर जुन्नर : ता- २८ फेब्रुवारी, 2025 श्री शिव छत्रपती महाविद्यालय, जुन्नर व मु. सा. काकडे महाविद्यालय, सोमेश्व...
प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
जुन्नर : ता- २८ फेब्रुवारी, 2025
श्री शिव छत्रपती महाविद्यालय, जुन्नर व मु. सा. काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर, ता. बारामती या दोन्ही महाविद्यालयाच्या हिंदी विभागांच्या संयुक्त विद्यमाने छात्र सहयोग कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये हिंदी विषयाचे महत्व, रोजगाराच्या संधी, व्यक्तिमत्व विकास, अनुशासन, नेतृत्व विकास व राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार पाठ्यक्रमात झालेल्या बदला संबंधी विस्तृत माहिती दोन्ही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांचा आप-आपसामधील सहयोग वाढविण्याच्या दृष्टीने त्यांना संवाद साधण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना जुन्नर महाविद्यालाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ. कॅप्टन बाबासाहेब माने यांनी केली. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात हिंदी भाषेचे महत्व व छात्र सहयोग कार्यक्रमाचे महत्व पटवून दिले. प्रमुख पाहुणे काकडे महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख प्रा. अच्युत शिंदे यांनी हिंदी विषयातून मिळणाऱ्या रोजगाराच्या संधी व व्यक्तिमत्व विकास व नेतृत्व विकास याविषयी विस्तृत माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष जुन्नर महाविद्यालयाचे प्राचार्य- डॉ. एम. बी. वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तयार केलेल्या पाठ्यक्रमाचे महत्व पटवून दिले. तसेच विद्यार्थ्यांनी विविध कौशल्य प्राप्त करून या कौशल्याचा जीवनात फायदा करून घेण्याचा संदेश दिला. यानंतर विद्यार्थ्यांना परस्पर संवाद साधण्यासाठी व एकमेकांच्या भावना जाणून घेण्यासाठीचा कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी काकडे महाविद्यालयाचे प्रा. जाधव पी. वाय [हिंदी विभाग], डॉ. आदिनाथ लोंढे [अध्यक्ष, संरक्षन तथा सामाजिक शास्त्र], डॉ. कल्याणी जगताप [हिंदी विभाग], श्री शुभम गायकवाड [शिक्षकेत्तर कर्मचारी] इत्यादी मान्यवर व दोन्ही महाविद्यालयातील हिंदी विषयाचे एकूण 60 विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. रेखा गायकावड यांनी केले.
COMMENTS