प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट सर काठापर बु. ता. आंबेगाव(पुणे) दि.२७ फेब्रुवारी. आंबेगाव तालुक्याच्या पुर्व पट्टयातील काठापुर बुद्रुक गावात...
प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट सर
काठापर बु. ता. आंबेगाव(पुणे) दि.२७ फेब्रुवारी.
आंबेगाव तालुक्याच्या पुर्व पट्टयातील काठापुर बुद्रुक गावात महाशिवरात्रीनिमित्त दोन दिवस भव्य बैलगाडा शर्यतींनंतर रात्री रुणानुबंध आयोजित व भैरवनाथ नाटय संस्था गंगापूर प्रस्तुत स्वराज्याचे सरनोबत अर्थात नेताजी पालकरांच्या जीवनावर भव्य ऐतिहासिक नाटक सादर झाले, ज्याला काठापुर, देवगाव, लाखणगाव, पारगाव सह पंचक्रोशीतील ग्रामस्थ पैपाहुणे प्रेश्रक म्हणून मोठ्या संख्येने उपस्थित होते, नाटकातील छत्रपती शिवाजी महाराजांची भुमिका करणारे अशोक नरवडे,नेताजी झालेले राजु गुंजाळ तर दिलेरखान रामदास सैद व मिर्झा राजे जयसिंग ची भुमिका करणारे अर्जुन नरवडे हे कलाकार प्रेक्षकांची दाद,व संवाद फेकीवर टाळ्यांचा कडकडाट घेऊन गेले.
याप्रसंगी स्वराज्याचे सरनोबत नाटकाचे सुत्रधार अनिल दत्तात्रय ठोसर, मराठा महासंघ जिल्हाप्रमुख प्रा.अनिल निघोट, प.महाराष्ट्र संपर्कप्रमुख व शिवसेना महिला आघाडी मा तालुकाप्रमुख प्रा.सुरेखाताई निघोट, मा.सरपंच गोविंद खांडगे, सरपंच अशोक करंडे, संचालक अशोक घुले या मान् काठापुरच्या रंगधारा नाट्यसंस्थेचे सदस्य व मान्यवर नटराजांचे पुजन व ऊदघाटनास ऊपस्थित होते.
भैरवनाथ नाट्यसंस्था गंगापूर खुर्द चे नाट्यकलाकार छत्रपती शिवाजी महाराज - अशोक नरवडे ,मिर्जा राजे जयसिंग - अर्जुन नरवडे, दिलेरखान - रामदास सैद, नेताजी पालकर - राजेंद्र गुंजाळ ,उदाजी - रामकृष्ण शेंडे, विश्वासराव - संजीव भंडारी तिकोजी - वसंत येवले, नवसाजी - सुरेश नरवडे, हौसा - भावना नरेंद्र ,छत्रपती संभाजी महाराज - कु. देवांग अशोक नरवडे ,महाराणी येसूबाई - कु. शर्वरी सदानंद येवले ,निर्मला - कु. आकांक्षा अर्जुन नरवडे तसेच वसंत येवले,रामकृष्ण शेंडे, निलेश सावंत,सुरेश नरवडे,बाळु रणदिवे, दशरथ नरवडे,बाबाजी ठोसर,प्रांजल सालकर,विजय सोनवणे, गोरक्ष साबळे यांनी आपल्या बहारदार अभिनयाने नाट्यरसिकांची मने जिंकुन ऐतिहासिक वातावरण निर्माण केले.
काठापुर ची रंगधारा नाट्यसंस्थाही यावर्षीचा अपवाद वगळता प्रत्येक वर्षी नाटक सादर करत असते ज्यात स्थानिक कलाकार भाग घेऊन आपली नाट्यकला जोपासतात.
यात्राकमिटी अध्यक्ष नवनाथ लोंढे, उपाध्यक्ष संतोष करंडे,सरपंच अशोक करंडे,मा सरपंच बाळासाहेब घुले,विजय करंडे,तानाजी कांबळे,विशाल करंडे,अमोल करंडे, देवगाव चे माजी सरपंच गोविंद खांडगे,प्रसिद्ध बैलगाडा मालक पी पी दाभाडे, फर्निचर चे मालक हनुमंत जाधव, नाट्यकलेवर प्रेम व आश्रय देणारे कैलास करंडे व ग्रामस्थ, महिलाभगिनी ,युवावर्ग मोठ्या संख्येने ऊपस्थित होता.
COMMENTS