मंचर प्रतिनिधी- राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ मराठा, कुर्मी, पटेल, पाटीदार, राजपूत समाज जोडण्याचे काम पुर्ण देशभर करत आहे मराठा समाजाच्य...
मंचर प्रतिनिधी-
राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ मराठा, कुर्मी, पटेल, पाटीदार, राजपूत समाज जोडण्याचे काम पुर्ण देशभर करत आहे मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर संघटना कार्य करत आहे मराठा आरक्षण, शेतीमालाला रास्त भाव, बेरोजगारी हे महत्त्वाचे प्रश्न शासनदरबारी सुटावेत यासाठी संघटना प्रयत्नशील आहे मराठा समाजाच्या कार्यात सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी प्रा अनिल निघोट यांची नियुक्ती करण्यात आली आहे निवडीचे पत्र संस्थापक डॉ कृषिराज टकले पाटील यांनी नुकतेच दिले
प्रा अनिल निघोट निवडी प्रसंगी म्हणाले की, मराठा समाज अराजकीय पध्दतीने एकजूट करण्यासाठी प्रयत्न करणार स्वाभिमानी मराठा महासंघ मराठा समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करत आहे आरक्षण हे महत्त्वाचे आहे मात्र उद्योग धंदयात सुध्दा समाजाने काम करावे
प्रा अनिल निघोट यांची पुणे जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष स्वराज्य भुषण एम के बीएन आर सागर , राष्ट्रीय कार्याध्यक्ष निलेश धुमाळ पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष दिनेश भैया कुर्मी, राष्ट्रीय सरचिटणीस राजबीर सिंह, राष्ट्रीय चिटणीस सलील सुर्यवंशी, महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष दिपक पवार, प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी अनिता पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष अमृता पठारे, दक्षता आघाडी प्रदेश अध्यक्ष शिवशंभू प्रिया जांभळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अलका सोनवणे, प्रदेश अध्यक्ष इतिहास आघाडी महेंद्रसिगं निंबाळकर, राज्य निरिक्षक भानुदास वाबळे पाटील,आदिंनी स्वागत केले आहे. तर मंचर निघोटवाडी फाटा येथे त्यांचा मा सरपंच निशाताई निघोट ,पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रा सुरेखाताई निघोट, विभागप्रमुख तुषार थोरात, दिनेश चिंचपुरे, वसंत निघोट, सुरेश पिंगळे, नवनाथ आवटे ,वाव्हळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रा.अनिल निघोट हे कुणाच्याही मदतीस सदैव तयार असतात एकनिष्ठ कट्टर शिवसैनिक म्हणुन गणेशोत्सव नवरात्रोत्सव करंडक, गुणवंत विद्यार्थी ज्येष्ठ -कारसेवक शिवसैनिक सत्कार,समाजभुषण पत्रकार पुरस्कार, आंबेगाव भुषण पुरस्कार, पोलीस, शासकीय अधिकारींमार्फत गरजु अडलेल्यांची कामे,गरीब-अनाथ मुला-मुलींस शैक्षणिक दत्तक घेऊन सर्व शैक्षणिक मदत करतात .तर शिवसेना फुटीनंतर पक्ष मशाल चिन्ह गावोगावी घरोघरी पोहोचवण्यासाठी जीवाचं रान करत फिरून कष्टाचे पैसे लावुन मंडळांसाठी होम मिनिस्टर, संगीतमय कार्यक्रमसायकल स्पर्धा, मरेथान, क्रिकेट स्पर्धा आयोजन केले असुन बाळासाहेब ठाकरे शिकवण समाजकारण ,राजकारणात सदैव अग्रेसर आहेत. प्रा. अनिल निघोट हे विविध मंडळांचे अध्यक्ष सल्लागार, छत्रपती शिवराय ,धर्मवीर संभाजी महाराज व शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे निस्सीम भक्त! त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी करणारे, वेगवेगळया प्रिंट व ईलेक्ट्रॉनिक मिडीयात पत्रकार संपादक अनेक संशोधनपर लेख,पुस्तकातील लेखांचे लेखक, व्याख्याते,मानसशास्त्र मराठी, हिंदी, राज्यशास्त्र ,समाजकार्य व ईतिहास अभ्यासक, समुपदेशक ,शैक्षणिक क्षेत्रात स्कुल शैक्षणिक करीअर ,परीक्षा एकेडमी संस्थापक ते कित्येक पदव्यांसह अनेक विषयात सेट नेट परीक्षा उत्तीर्ण होऊन पि एचडी या सर्वोच्च पदवीपर्यंत पोहोचुन शैक्षणिक क्षेत्रात प्रेरणास्पद कामगीरी करणारे,ज्यांच्या हाताखाली हजारो शिक्षक घडले घडत आहेत,असे प्रा.अनिल निघोट. ज्यांनी मा.तालुकाप्रमुख भारतीय विद्यार्थी सेना, आंबेगाव चे तालुकाप्रमुख म्हणुन काम करुन आपल्या संघटन कौशल्य दाखवले. समाजाचे आपण काही देणं लागतो या भावनेतुन पदरपैशाने समाजसेवा करणारे प्रा.अनिल नारायणशेठ निघोट आपणास मराठा महासंघाच्या पुणे जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल सर्व नातेवाईक, शिवसैनिक मित्रमंडळींकडुन हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन केले जात आहे.
COMMENTS