नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतील आपल्या भाषणात काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या "गरीबी ...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतील आपल्या भाषणात काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या "गरीबी हटाव" घोषणेवर टीका करत म्हटले की, "काँग्रेसने पाच दशकं गरीबी हटावच्या घोषणा दिल्या, पण गरीबी हटली का ?" काँग्रेसने अनेक वर्षं सत्ता उपभोगली, मात्र गरिबी हटवण्याच्या आश्वासनांवर परिणामकारक कृती केली नाही.
उलट, गरिबी हटण्याऐवजी वाढत गेली. असा प्रहार देखील चढवला.
मोदींनी सांगितले की, "1950 पासून काँग्रेस सत्तेत होती, त्यांनी 'गरीबी हटाव'ची घोषणा दिली, मात्र 21व्या शतकातही गरीबांसाठी मोठ्या प्रमाणावर योजना आणाव्या लागत आहेत. यावरूनच त्यांचा अपयश स्पष्ट होते." त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, त्यांच्या सरकारने गरिबांसाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या आहेत, ज्या प्रत्यक्षात गरिबी हटवण्यासाठी काम करत आहेत.
पंतप्रधान मोदींनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना, जनधन योजना, आणि आयुष्मान भारत योजना यांसारख्या योजनांचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, या योजनांमुळे कोट्यवधी गरीब कुटुंबांना थेट फायदा झाला असून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होता आले आहे. गरिबांच्या सक्षमीकरणासाठी सरकार काम करत असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
मोदींनी काँग्रेसवर टीका करत म्हटले की, "काँग्रेसने केवळ गरीबांच्या नावावर राजकारण केले. पण गरिबी हटली नाही, उलट गरिबांना विकासाच्या प्रवाहातून दूर ठेवण्यात आले." ते पुढे म्हणाले की, "जनतेने आता अशा दिशाभूल करणाऱ्या घोषणा ओळखल्या आहेत. त्यांना केवळ घोषणांपेक्षा कृती आणि विकास हवा आहे."
पंतप्रधान मोदींच्या या टीकेनंतर संसदेत मोठा गोंधळ उडाला. काँग्रेससह विरोधी पक्षांनी मोदींच्या विधानाला जोरदार आक्षेप घेतला. काही काँग्रेस नेत्यांनी सांगितले की, "मोदी सरकार स्वतःला गरीबांचा तारणहार म्हणवत आहे, पण बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे." मोदींच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा सुरू झाल्या असून विरोधक आणि भाजप यांच्यात तीव्र वाद रंगले आहेत.
COMMENTS