प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट सर संपुर्ण हिंदुस्थात आपल्या पराक्रमाने मराठी साम्राज्य वाढवणारे यशवंतराव होळकरांची जन्मभुमी खेड तालुक्यातील ...
प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट सर
संपुर्ण हिंदुस्थात आपल्या पराक्रमाने मराठी साम्राज्य वाढवणारे यशवंतराव होळकरांची जन्मभुमी खेड तालुक्यातील ऐतिहासिक वाफगाव येथे श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर विदयालयात डॉ. एम ए खान शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या छात्रसेवेस सुरुवात झाली. विद्यार्थीशिक्षकांना आपल्या बी एड अभ्यासक्रमाचा भाग म्हणून प्रत्यक्ष शालेय कामकाजात सहभागी होता येते.भावी शिक्षक म्हणून आवश्यक बाबी , वर्ग अध्यापन,मुल्यमापन, शालेय, अभ्यासेतर उपक्रमांचे नियोजन, आयोजन, परिपाठ, विद्यार्थी अध्ययन, अध्यन अनुभव वेळापत्रक अशा अनेक बाबींची माहिती सहभागातून मिळते. आवश्यक बाबी व शैक्षणिक समस्यांवर स्थानिक शिक्षक व मुख्याध्यापकाशु चर्चा करुन मार्गदर्शन मिळते.
यावेळी मुख्याध्यापक जयश्री अस्वले,गणेश गोगावले, लोखंडे वाय.डी., पाचपुते डी.एस,मोहरे एस बी, टेमकर के .पी. ,पवार एम.जी.सर, कराळे व्ही .बी. व शिक्षकमहोदयांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी विभागप्रमुख प्रा अनिल निघोट यांनी मुख्याध्यापक व शिक्षकांचे आभार मानुन शालेय कामकाज व अध्यापनाची माहीती ,अनुभव घेण्याची विद्यार्थीशिक्षकांना सुवर्णसंधी असुन या संधीचे सोने करण्याचे आवाहन केले, तर मार्गदर्शक प्रा.सुरैय्या शेख यांनी विदयार्थीशिक्षकांना मार्गदर्शन करताना बी एड अभ्यासक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी व शैक्षणिक उपयोजनावर भर देऊन शैक्षणिक साधनांसह विद्यार्थ्यांचे अवधान व अध्यनावर लक्ष देण्याचे आवाहन केले.
यावेळी होळकर विदयालयाचा शिक्षकव्रुंद व धनश्री गोरडे,माया साकोरे,स्वाती गायकवाड, अक्षय खुरपे,शुभम नवले,म्रुणाली नाईकडे,आश्विनी कोळेकर, बारणे प्रणिता, भोर दिक्षा, प्रियंका घोगरे, काळे नयना हे विद्यार्थीशिक्षक ऊपस्थित होते.
COMMENTS