वीज कंत्राटी कामगार,संघटित व असंघटीत क्षेत्रात कार्यरत सचिन मेंगाळे यांची भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात ...
वीज कंत्राटी कामगार,संघटित व असंघटीत क्षेत्रात कार्यरत सचिन मेंगाळे यांची भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सचिन मेंगाळे भारतीय मजदूर संघात 1997 पासून पुर्णकालीक म्हणून कार्यरत आहेत, विविध क्षेत्रातील कामगारांच्या समस्या, वेतन वाढ करार , आंदोलने व्दारे कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शिक्षण मास्टर ईन लेबर लाॅ अॅड लेबर वेलफयर असे झाले आहे.
पुणे येथे 1 व 2 फेब्रुवारी रोजी झालेल्या भारतीय मजदूर संघाच्या प्रदेश बैठकी मध्ये प्रांत प्रभारी सी.वी.राजेश, प्रदेश अध्यक्ष ऍड.अनिल ढुमणे, महामंत्री किरण मिलगिर व संघटनमंत्री बाळासाहेब भुजबळ यांनी ही निवड घोषित केली.
आगामी काळ हा कंत्राटी कामगारांचाच आहे व अशा वेळी
संघटित असंघटीत क्षेत्रात शोषित पीडित वंचित कांमगारांच्या हितार्थ शासन व प्रशासना विरोधात न्याया साठी सतत व प्रामाणिकपणे अथक संघर्ष करत असलेल्या सचिन मेंगाळे यांना भारतीय मजदूर संघाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळणे हा दुग्धशर्करा योग असल्याचे मत वीज कंत्राटी कामगार संघाचे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात महाराष्ट्र राज्यातील कंत्राटी कामगारांनी व्यक्त केले आहे.
भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून सर्वसामान्य कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे मनोगत सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केले आहे.
COMMENTS