प्रतिनिधी प्रा.अनिल निघोट सर डॉ.एम.ए.खान शिक्षणशास्त्र महाविद्यालय मंचर यांच्या विदयार्थीशिक्षकांच्या छात्रसेवेस ज्ञानगंगा ईंग्लिश मेडीअम ...
प्रतिनिधी प्रा.अनिल निघोट सर
डॉ.एम.ए.खान शिक्षणशास्त्र महाविद्यालय मंचर यांच्या विदयार्थीशिक्षकांच्या छात्रसेवेस ज्ञानगंगा ईंग्लिश मेडीअम स्कूल व ज्युनिअर कॉलेज आळंदी येथे शुभारंभ झाला. यात भावी शिक्षकांना शैक्षणिक कामकाज, संस्था, अभ्यासक्रम जाणुन घेऊन अध्यापन, अभ्यास व अभ्यासेतर उपक्रम करावयाचे असल्याने प्रत्यक्ष कामकाज करायचे असल्याने सम्रुद्ध अनुभव मिळणार असुन भावी कारकिर्दीत त्याचा ऊपयोग होणार आहे.
यावेळी स्कूल चे संस्थापक अध्यक्ष प्रिंसिपल विजय गुळवे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करुन शालेय कामकाज माहिती करण्याची व अध्यापनाची संधी ऊपलब्ध झालीय ,त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यासपुर्वक अध्यापन व प्रत्यक्ष उपक्रम नियोजन व कार्यवाहीत मनापासून सहभागी होत शालेय विद्यार्थ्यांशी प्रेम व आपुलकीने वागलात तर शिक्षक म्हणून यशस्वी व्हाल असे मत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. तर विभागप्रमुख, मार्गदर्शक प्रा.अनिल निघोट यांनी शाळा ऊपलब्ध करुन दिल्याबद्दल संस्थेचे आभार मानुन सर्व विद्यार्थीशिक्षकांना शालेय कामकाज अभ्यास व अनुभवाचे महत्व सांगुन भावी शिक्षक म्हणून विद्यार्थीकेंद्रीत अध्यापनपद्धती चा वापर करा,विद्यार्थ्यांचा सन्मान ठेवुन त्यांना प्रेरणा प्रोत्साहन द्या असे आवाहन केले.
यावेळी विद्यार्थीशिक्षक अनिता गुळवे, स्नेहल हुलावळे, निलम पारवे, गीता पार्डे, मोनाली भैसारे,मारोती वाघमारे, चौधरी निकीता,केनी प्रतिक्षा, अजित विरणक हे ऊपस्थित होते.
COMMENTS