प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या मजकूरास" ताम्रपट " असे म्हणतात. त्या ताम्रपटावर राजाज्ञा , दान...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या मजकूरास" ताम्रपट " असे म्हणतात. त्या ताम्रपटावर राजाज्ञा , दानपत्रे, जमीन अनुदान तसेच दूरगामी आज्ञा करून ठेवण्याची प्रथा असल्याचे जुन्नरचे इतिहास अभ्यासक बापूजी ताम्हाणे यांनी सांगितले.
ताम्हाणे म्हणाले की , प्राचीन - मध्ययुगीन काळात नोंदीसाठी शिलालेखाचा वापर होत असे. दगडावर लेखन करणे हे कौशल्याचे आणि कष्टपद होते. दगडावरील लेखना करता ब्रह्मी लिपी तुलनेने सोपी होती पण कालांतराने ' देवनागरी लिपी ' सारख्या इतर वळणदार लिप्यांचा वापर वाढल्याने अक्षरे कोरणे कठीण झाले. त्यामुळे राजकर्त्यांनी आपली दानपत्रे धातूच्या पत्रावर कोरण्यास सुरुवात केली. दगडापेक्षा तांबे धातूच्या पत्रावर अक्षरे कोरणे तुलनेने सोपे झाले. काही ताम्रपट ब्राह्मी लिपीत प्राकृत मध्ये कोरले गेले.
ताम्रपटावरील मजकूराची अक्षरे स्पष्ट व खोल कोरलेली असल्यामुळे ती वाचण्याला फारशी अडचण पडत नसत. काही प्रदेशातील ताम्रपट कोरणारे कोरके आपले लेखन कौशल्य दाखविण्यासाठी आपल्याला येत असलेल्या सर्व अक्षरवाटिकांचे मिश्रण आपल्या लेखनात करीत असत.
" ताम्रपट " कोरलेल्या पत्र्याच्या डाव्या बाजूच्या वरील कडेला मध्यभागी गोल छिद्र पाडून त्यातून धातूची जाड कडी ( तार )ओवली जाई . तिची टोके एकत्र करुन त्यावर राजमुद्रा अंकित करुन दानपत्र दिले जाई. कडीत एकात एक तीन कधी दोन तर कधी पाच अशा पद्धतीने ओवलेल्या पत्रावर पुढील आणि मागील बाजूस दानलेख कोरलेले असतात.
ताम्रपटाच्या प्रथम पत्रावर दैवतांना नमन व प्रशंसा कोरलेली असते .ताम्रपट प्रामुख्याने दानपत्रे असतात . निरनिराळ्या दानाचा, राजवटींचा इतिहास समजून घेण्यास ते उपयुक्त ठरत असतात . ताम्रपटावर डावीकडून उजवीकडे मजकूर कोरला जातो.
ताम्रपटाच्या काही गोलाकार कडीवर मध्यभागी एक आयत, वर्तुळाकार , लंबगोलाकार भागावर गरुड पक्षी , वराह प्राणी किंवा पुढचे पाय गुडघ्यातून दुमडून बसलेल्या नंदी प्राण्याची ठशीव आकृती असते. हे राजवंशाचे राजचिन्ह म्हणून ओळखले जाते. त्याखाली शिक्का ठोकून राजमुद्रा अंकित करून दानपत्र संबंधित प्राधिकरणाऱ्या साक्षीने सीलबंद केले जात असे. राजमुद्रेवर चंद्र आणि सूर्य यांच्या आकृती उठावात कोरलेल्या असतात. चंद्र - सूर्य प्रतिमांचा अर्थ असा होतो की , जो पर्यंत चंद्र , सूर्य आहे तोपर्यंत हे ताम्रपटातून दिलेले दान अबाधित राहील असे बापूजी ताम्हाणे ह्यानी सागितले.
COMMENTS