मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून दिला जाणार आहे. फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी ३५०० कोटींच्या चेक...
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून दिला जाणार आहे. फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी ३५०० कोटींच्या चेकवर सही केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १५ फेब्रुवारीला दिली होती.
अजित पवार यांनी पुढील आठवड्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील असे सांगितले होते. मात्र, आठवडा उलटून गेल्यानंतर देखील महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात झाली नव्हती. यावरुन विरोधकांकडून टीका सुरु करण्यात आली. अखेर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आजपासून मिळण्यास सुरुवात होणार असल्याची महिला व बाल विकास विभागाकडून देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे १५०० रुपये आजपासून मिळणार आहेत. जानेवारी महिन्यात २ कोटी ४१ लाख महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले होते. लाडकी बहीण योजनेतील अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरु केल्यानंतर साधारणपणे ९ लाख महिलांची संख्या कमी झाल्याची माहिती होती. त्यामुळे यावेळी जानेवारीच्या तुलनेत कमी महिलांना लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये मिळतील.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता आज पासून दिला जाणार असल्याची माहिती महिला व बाल विकास विभाग विभागाने दिली आहे. अर्थ खात्याकडून फेब्रुवारी महिन्यासाठी मिळणारी रक्कम महिला व बालकल्याण खात्याला वर्ग झाली आहे.
काही तांत्रिक बाबीमुळे पैसे देण्यास उशीर झाल्याची खात्याची माहिती, देखील विभागाकडून देण्यात आली आहे. फेब्रुवारी महिना संपायला ४ दिवस बाकी असताना अद्याप हप्त्याची रक्कम जमा होतं नसल्यामुळे सरकारवर विरोधकांकडून सरकारकडून टीका करण्यात येत होती.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत ७ हप्त्यांचे १०५०० लाडक्या बहिणींना मिळाले आहेत. आता आठव्या हप्त्याचे १५०० रुपये मिळाल्यानंतर महिलांना सरकारकडून लाडक्या बहिणींना मिळालेली रक्कम १२००० पर्यंत मिळेल. दरम्यान, महायुतीनं लाडक्या बहिणींना सत्ता पुन्हा आल्यास २१०० रुपये देण्याचं आश्वासन दिले होते, ते कधी पूर्ण होणार याकडे देखील महिलांचे लक्ष लागले आहे.
लाडकी बहीण योजनेचे निकष काय?
* वय २१ ते ६० वर्षे
* दरमहा १५०० रुपये मिळणार
* दरवर्षी शासन ४६००० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार
* अंमलबजावणी : जुलै २०२४ पासून
* कोण असणार पात्र?
* महाराष्ट्र रहिवासी
* विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
* लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.२.५० लाखापेक्षा जास्त नसावे
* ६० वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल
अपात्र कोण असेल?
* २.५० लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
* घरात कोणी Tax भरत असेल तर
* कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
* कुटुंबात ५ एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
* कुटुंबातील सदस्यांकडे ४ चाकी वाहन असेल तर (ट्रॅक्टर सोडून)
COMMENTS