प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर जुन्नर : आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर सर करणारा पुणे जिल्ह्यातील पहिला आदिवासी गिर्यारोहक! पुणे जिल्ह्याती...
प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
जुन्नर : आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर सर करणारा पुणे जिल्ह्यातील पहिला आदिवासी गिर्यारोहक!
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील तळेरान (कोकाटेवाडी) येथील निखिल किसन कोकाटे हे किलीमांजारो (५८९५ मीटर) – आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर सर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. सातही खंडांतील सर्वोच्च शिखरांवर चढाई करण्याचा मानस असलेले ते पुणे जिल्ह्यातील पहिले आदिवासी गिर्यारोहक ठरणार आहेत.
ही मोहिम महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागाच्या पाठबळाने हाती घेण्यात येत असून, गिर्यारोहण क्षेत्रातील आदिवासी तरुणांसाठी नवा आदर्श निर्माण करण्याचा निखिल यांचा मानस आहे. साहसी पर्यटनाद्वारे आदिवासी समाजासाठी रोजगारनिर्मिती करणे आणि स्थानिक आदिवासी संस्कृतीला जागतिक स्तरावर पोहोचवणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
निखिल कोकाटे यांची गिर्यारोहण क्षेत्रातील वाटचाल:
• बेसिक आणि अॅडव्हान्स माऊंटेनिअरिंग कोर्स पूर्ण (हिमालयीन माऊंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट, दार्जिलिंग)
• हिमालयातील अनेक मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्या
• माऊंट युनाम (६१११ मीटर), माऊंट ब्लॅक पीक (६३८७ मीटर) यांसारखी शिखरे सर केली
• १०+ वर्षांचा गिर्यारोहण आणि साहसी पर्यटनातील अनुभव
• प्रथमोपचार (Wilderness First Responder), पर्यटन मार्गदर्शन आणि आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण पूर्ण
• महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालय (Directorate of Tourism, Maharashtra) येथे साहसी प्रशिक्षणकर्ता (Adventure Trainer) म्हणून कार्यरत होते.
• राज्यातील अनेक पर्यटन आणि साहसी खेळ प्रकल्पांसाठी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले.
• आदिवासी आणि ग्रामीण भागातील युवकांना साहसी पर्यटनाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत.
ही मोहिम का महत्त्वाची आहे?
आदिवासी युवकांसाठी प्रेरणादायी उदाहरण:
• पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यातील आदिवासी युवक सातही खंडांतील सर्वोच्च शिखरांवर चढाई करण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे.
साहसी पर्यटनाच्या संधी:
• गिर्यारोहण व साहसी पर्यटनाद्वारे स्थानिक आदिवासी युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्याचा प्रयत्न.
संस्कृतीचा जागतिक स्तरावर प्रचार:
• आदिवासी जीवनशैली आणि संस्कृतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा संकल्प करून
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी त्याला संपूर्ण प्रक्रिया आणि दस्त ऐवजीकरणामध्ये अमूल्य सहकार्य करणाऱ्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव येथील प्रकल्प अधिकारी मा.प्रदीप देसाई सर यांचे सहकार्य लाभले.
तसेच, कार्यालयातील सहाय्यक प्रकल्प अधिकारी (विकास) मा. सोनुल कोतवाल आणि संबंधित श्री.लिपिक माणिक चकवे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
याशिवाय, मा. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे स्वीय सहाय्यक श्री. तुषारजी डोके यांनी ही विशेष प्रयत्न केले.
"निखिल कोकाटे यास किलीमांजरो मोहिमेसाठी सर्व स्तरातून कौतूक होत आहे. साहसी पर्यटनाद्वारे आदिवासी लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. स्थानिक आदिवासी संस्कृतीला जागतिक स्तरावर पोहोचवणे तसेच गिर्यारोहण क्षेत्रातील अनुभव साहसी मोहिमा आदिवासी समाजापर्यंत पोहोचवणे यासाठी प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहे. गिर्यारोहणातून पर्यटन हे एक नवीन आर्थिक उत्पन्नाचे साधन आदिवासी समाजासाठी उपलब्ध होईल."
निखिल कोकाटे (गिर्यारोहक युवक)"आफ्रिका खंडातील सर्वोच्च किलीमांजरो शिखर सर करण्यास जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार असून भविष्यात सातही खंडातील सर्वोच्च शिखर सर करण्याचा निखिलचा विचार आहे.आदिवासी विकास विभागाच्या न्यूक्लिअस बजेट योजनेतून निखिलला आर्थिक मदत मिळाली. मा.आदिवासी विकास मंत्री,आदिवासी विकास विभागातील सर्व अधिकारी व प्रकल्प अधिकारी श्री. प्रदीप देसाई यांनीही मोलाचे सहकार्य केले. त्याबद्दल निखिलचे सर्व स्तरातून कौतूक व अभिनंदन होत आहे.
COMMENTS