बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आण...
बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने हे जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.
दोन किंवा त्यापेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. नियमाचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरोधात कारवाई केली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या प्रश्नावर नागरिक एकत्र येत आहेत. त्याचबरोबर १५ फेब्रुवारी रोजी मनोज जरांगे पाटील हे सामूहिक साखळी उपोषणासाठी बसणार होते. त्या अनुषंगाने आणि बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणाने बीड जिल्ह्यात अनेक सामाजिक संघटना न्याय मागण्यासाठी एकत्र येत आहेत.
यासोबतच जिल्ह्यात सध्या दहावी आणि बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू झाल्या आहेत. तर दहावीची परिक्षा २१ फेब्रुवारीपासून चालू होणार आहे. त्या अनुषंगाने हे जमाबंदी आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश लागू करण्यात आला आहे. १५ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत हा आदेश लागू असणार आहे. २ किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही, असं आदेशात नमूद करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक बीड यांच्या अहवालावरून बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) प्रमाणे जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणीही लाठी, काठी, बंदूक, तलवार, कोणतेही ज्वलनशील पदार्थ जवळ बाळगणार नाहीत असे झाल्यास आपल्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.
COMMENTS