प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट सर रेटवडी तालुका खेड येथील शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेले श्रीधरराव वाबळे विद्यालयात मंचर च्या डॉ एम.ए.खान शिक्ष...
प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट सर
रेटवडी तालुका खेड येथील शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेले श्रीधरराव वाबळे विद्यालयात मंचर च्या डॉ एम.ए.खान शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष विदयार्थीशिक्षकांच्या छात्रसेवेचे ऊद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष मल्हारराव वाबळे पाटील यांनी करुन विद्यार्थीशिक्षकांना शुभेच्छा देत भारताची भावी पिढी घडवण्याचे पवित्र कार्य तुमच्या हातुन घडतेय हे तुमचे सौभाग्य आहे. तर मार्गदर्शक प्रा अशिर शेख यांनी आपल्या विद्यार्थीशिक्षकांनी अभ्यासपुर्वक विदयार्थीकेंद्रीत अध्यापनातुन अध्ययनिची गोडी आपल्या विद्यार्थ्यांना लावुन ज्ञानी व गुणवंत विद्यार्थी घडवावेत असे आवाहन केले.
यावेळी मैदानी स्पर्धा, वक्त्रुत्व स्पर्धा घेण्यात आल्या ज्यात विद्यालयाच्या विदयार्थ्यांनी आपले कलागुण, गुणवत्ता, नैपुण्य सादर केले.
यावेळी मुख्याध्यापक रामदास पवार, पर्यवेक्षक कोहीणकर सर,पुजारी सर, तितर मॅडम, वाबळे मॅडम व विद्यार्थीशिक्षक जगदाळे धनश्री,कदम सखाराम,माधवी राकेश, काळे किर्ती, केदारी स्वाती,मोरे चैताली, पडवळ दिपाली, पाकेरे रजत,पवार स्मिता,साळवी संदीप, सावंत विजया,शिंदे नितीन, तांबे वैशाली ऊपस्थित होते.
COMMENTS