प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे ३९५ वी शिवजयंती मोठ्या आनंदात ...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे ३९५ वी शिवजयंती मोठ्या आनंदात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली.
संस्थेचे सचिव विवेक शेळके यांच्या शुभहस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.यावेळी सामूहिक शिव आरती घेण्यात आली.आरती नंतर महाराजांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करून सर्व शैक्षणिक संकुलाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहलताई शेळके,राजुरी ग्रामपंचायत सदस्य शाकीर भाई चौगुले,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,बीसीएस चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप,रिसर्च व इनोवेशन सेलचे डायरेक्टर डॉ.प्रतिक मुणगेकर समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.संतोष घुले,समर्थ पॉलीटेक्निकचे प्राचार्य अनिल कपिले, डॉ.शरद पारखे,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,तसेच सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समर्थ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या चरित्रावर आधारित नृत्य व गाणी सादर केली.संकुलामध्ये शिवजयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा,रांगोळी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके म्हणाले की,३९५ वी शिवजयंती साजरी करत असताना सर्वांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्राचा आदर्श समोर ठेवून वागायला हवे.छत्रपतींनी अगदी लहान वयात स्वराज्य स्थापनेचा संकल्प करून आपले बुद्धिचातुर्य,शौर्य,संघटनकौशल्य,नेतृत्व आणि दूरदर्शीपणा या गुणांच्या जोरावर तो सिद्धीस देखील नेला.शिवरायांचे राज्य हे खर्या अर्थाने रयतेच्या कल्याणाचा विचार करून निर्माण केलेले आणि चालवलेले राज्य होते.छत्रपतींचे व्यक्तिमत्व नेतृत्वगुण,गुणग्राहकता,माणसांची अचूक पारख,संघटन कौशल्य,प्रसंगावधान,गनिमी कावा,जिद्द,चिकाटी,मेहनत,धाडस,साहस,शौर्य,औदार्य,दृढ निश्चयी,अचूक निर्णय क्षमता,वेळेचे नियोजन,जाज्वल्य राष्ट्रभक्ती अशा असंख्य सद्गुणांनी समृद्ध झालेले होते.आजच्या तरुणांनी छत्रपतींच्या याच सद्गुणांचे अनुकरण करावे व जीवनात उत्कर्ष साधावा असे यावेळी संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके म्हणाले.
डॉ.अजित आपटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि आधुनिक व्यवस्थापन या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शिवाजी महाराजांनी त्यांच्या व्यवस्थापनामध्ये शेतीला महत्व आणि प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम केले.फॅमिली पेन्शन योजना सुरू करणारे जगातील पहिले राजे छत्रपती शिवाजी महाराज होय.
विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध पैलूंचा अभ्यास करावा.प्रत्येकाने आपल्या जीवनात छत्रपतींच्या पैलूंचे अनुकरण करावे व जीवनात यशस्वी व्हावे असे उद्गार डॉ.अजित आपटे यांनी काढले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी तर आभार डॉ.लक्ष्मण घोलप यांनी मानले.
COMMENTS