प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर ) इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन (IEDSSA) मार्फत घेण्यात आलेल्या विभागीय (डी-१ झ...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )
इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन (IEDSSA) मार्फत घेण्यात आलेल्या विभागीय (डी-१ झोन) स्पर्धा नुकत्याच समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे पार पडल्या.
डी-१ झोन मधील शासकीय तंत्रनिकेतन अवसरी,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, समर्थ पॉलीटेक्निक बेल्हे,भिवराबाई सावंत पॉलिटेक्निक वाघोली, पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक आकुर्डी,जयहिंद पॉलीटेक्निक कुरण,बारामती कॉलेज ऑफ फार्मसी,श्रीरामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनियरिंग लोणीकंद,कुसरो वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,जे एस एस एम एस पॉलिटेक्निक नऱ्हे,अजिंक्य डी वाय पाटील स्कूल इंजिनिअरिंग पॉलीटेक्निक लोहगाव आधी महाविद्यालयातून एकूण १४९ विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते.
विभागीय ॲथलेटिक्स स्पर्धेत समर्थ पॉलिटेक्निक च्या नेहा दरेकर हिने २०० मीटर व ४०० मीटर धावणे या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला.
८०० मीटर धावणे या स्पर्धेत मुस्कान मुजावर हिने प्रथम क्रमांक पटकावला.
१५०० मीटर धावणे (मुली):
प्रथम क्रमांक-आरती लेंडे समर्थ पॉलिटेक्निक बेल्हे
गोळाफेक-
प्रथम क्रमांक- अनिकेत ताजवे (समर्थ पॉलीटेक्निक,बेल्हे)
थाळीफेक (मुली):
प्रथम क्रमांक-चारू मुळे (समर्थ पॉलिटेक्निक)
भालाफेक (मुले):
प्रथम क्रमांक:रमीजराजा शेख (समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे)
तिहेरी उडी (मुली):
द्वितीय क्रमांक:साक्षी पळसकर (समर्थ पॉलिटेक्निक, बेल्हे )
तिहेरी उडी (मुले):
द्वितीय क्रमांक:यश चिंचवडे (समर्थ पॉलिटेक्निक, बेल्हे )
भालाफेक (मुली):
द्वितीय क्रमांक-सरगम मुळे (समर्थ पॉलीटेक्निक)
थाळी फेक :-
द्वितीय क्रमांक-सरगम मुळे (समर्थ पॉलिटेक्निक)
थाळीफेक (मुले):
द्वितीय क्रमांक -अनिकेत ताजवे
लांब उडी (मुली):
द्वितीय क्रमांक-साक्षी बाचकर
(समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,बेल्हे)
४०० मीटर धावणे (मुली) या स्पर्धेमध्ये विद्या पाबळे हिने द्वितीय क्रमांक मिळविला.
२०० मीटर धावणे (मुले) या स्पर्धेमध्ये सोहम शिंदे या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक मिळवला.
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या सर्व खेळाडूंची आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांनी दिली.
सदर विद्यार्थ्यांना क्रीडा संचालक एच पी नरसुडे,प्रा.संजय कंधारे,प्रा.महेंद्र खटाटे,प्रा.नंदकिशोर मुऱ्हेकर,प्रा.ईश्वर कोरडे,डॉ.सचिन भालेकर,वायसे सर,सुरेश काकडे,मोनिका चव्हाण व पॉलिटेक्निक विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल ताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,समर्थ पॉलिटेक्निकचे प्राचार्य अनिल कपिले,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके,टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
COMMENTS