प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन बंगलोर व सॅमसंग मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या "अन्वेषण...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन बंगलोर व सॅमसंग मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या "अन्वेषण" या राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धेत समर्थच्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केल्याची माहिती समर्थ अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे व गुरुकुल चे प्राचार्य सतिश कुऱ्हे यांनी दिली.
ही स्पर्धा सॅमसंग सेमिकन्डक्टर इंडिया यांनी पुरस्कृत केली होती.अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या सहयोगाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी नुकतीच विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रकल्प स्पर्धा लोणीकंद पुणे येथे आयोजित करण्यात आली होती.
शाळा आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमधील असलेल्या नवउपक्रमशीलतेला,नवनवीन कल्पनांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने या विज्ञान आणि तंत्रज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयातील कम्प्युटर इंजिनिअरिंग अंतिम वर्षात शिकत असलेले ऋतुजा गवांदे व वैष्णवी गणेश आणि समर्थ गुरुकुल मधील प्रगती औटी व प्रांजल दाते या ग्रुप ने सादर केलेल्या "कृषी तज्ञ" या प्रकल्पास प्रथम क्रमांक मिळाला.रुपये तीस हजार रोग सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग या विभागातील सिद्धार्थ वाघ व दिनेश थोरात आणि समर्थ गुरुकुल मधील भक्ती जाधव व सानिका बांगर यांनी सादर केलेल्या आर एफ आय डी बेस्ट पॉल्युशन कंट्रोल युजिंग आय ओ टी या प्रकल्पास पाचवा क्रमांक प्राप्त झाला. या विद्यार्थ्यांना रुपये दहा हजार रोख,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
अभियांत्रिकीच्या सुजित भोगाडे व निकिता मगर आणि समर्थ गुरुकुलच्या अथर्व भांबेरे व वेदांत पिंगळे यांनी बनवलेल्या केअर ट्रॅक जूनियर्स या प्रकल्पास तसेच आदेश मुसळे आणि श्रेयश डोंगरे व वेदांत चिकणे यांनी तयार केलेल्या स्मार्ट मशीन फॉर सॉर्टिंग स्पाईल्ड ओनियनस या दोन्हीही प्रकल्पास उत्तेजनार्थ बक्षीसे देण्यात आली. या दोन्ही प्रकल्पांना प्रत्येकी रु.५,०००/- रोख सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
हा प्रकल्प तयार करण्यासाठी समर्थ अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाचे विभागप्रमुख प्रा.निर्मल कोठारी, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. स्नेहा शेगर,प्रा.प्रियांका लोखंडे यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर तसेच संकुलातील सर्व विभागाचे प्राचार्य विभागप्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
COMMENTS