प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे व समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ लॉ कॉलेज,बेल्हे बह...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे व समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ लॉ कॉलेज,बेल्हे बहि:शाल शिक्षण मंडळ आणि ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे आयोजन समर्थ संकुलामध्ये नुकतेच करण्यात आले होते.
या व्याख्यानमालेचे उद्घाटन समर्थ शैक्षणिक संकुलाचे कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,समर्थ लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुनील कवडे,उपप्राचार्य प्रा.शिवाजी कुमकर,बीसीएस चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप,अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके,पॉलिटेक्निकचे प्राचार्य अनिल कपिले,समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल चे डॉ.राजेंद्र निचित,केंद्र कार्यवाह प्रा.ज्ञानेश्वर सावळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘सर्वसमावेशक शिक्षण कौशल्य’ या विषयावर व्याख्यान देऊन व्याख्यानमालेचे पहिले पुष्प प्रा.दिलीप मोराळे यांनी गुंफले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी टेक्नॉलॉजिचे गुलाम बनू नका,स्वतःच्या मेंदूचा वापर करा,चौकसपणे अभ्यास करा,मोबाईलचा योग्य वापर करून आपले ज्ञान वाढविण्याचा प्रयत्न करा असा मोलाचा सल्ला दिला.‘सर्वसमावेशक शिक्षण कौशल्य’ हाच जीवनाचा आधार असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.तर ‘स्वराज संस्थापक छ.शिवाजी महाराज’ या विषयावर बोलताना डॉ.जयसिंग गाडेकर यांनी महाराजांचा आदर्श आजच्या तरुणाईने घेतला पाहिजे तो वैचारिकपणे तुम्ही घ्यावा. तुमच्या वागण्यामध्ये व आचरणात तो दिसला पाहिजे असे मत व्यक्त केले. ‘तरुणांचे आदर्श कोण असावेत’? या विषयावर तिसरे पुष्प अनिल गुंजाळ यांनी गुंफले.त्यांनी मनमोकळेपणाने विद्यार्थ्याशी संवाद साधला.आजच्या पिढीला आपण व्यसनाधीन होणार नाही,विचारवंतांचे चरित्र वाचले पाहिजेत,चांगले आयुष्य जगण्यासाठी चांगले आदर्श असले पाहिजेत व माझ्या दृष्टीने खरं बोलणे हा पण एक आदर्श आहे आणि हे आपण स्वत:च करू शकतो असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.सुनील कवडे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी केले तर सर्वांचे आभार केंद्र कार्यवाह प्रा.ज्ञानेश्वर सावळे यांनी मानले.
COMMENTS