छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन जणांनी एका मेडिकल चालवणाऱ्या महिलेचा पाठलाग करून तिची छेड काढत शरीर सुखाच...
छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन जणांनी एका मेडिकल चालवणाऱ्या महिलेचा पाठलाग करून तिची छेड काढत शरीर सुखाची मागणी केली आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
अशोक पवार पाटील आणि रवींद्र एकनाथ गायकवाड असे गुन्हा दाखल झालेल्या दोन आरोपींची नावे आहेत. तिसरा आरोपी अज्ञात असून त्याच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हे तिन्ही आरोपी मागील काही दिवसांपासून पीडित महिलेचा पाठलाग करत होते. त्यांनी पीडितेचे फोटो काढून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
आरोपी अशोक पवार हा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे. पवार आणि रवींद्र गायकवाड हे पीडितेच्या ओळखीचे आहेत. या ओळखीतूनच ते 'तू खूप सुंदर दिसतेस, तुझ्याशी मैत्री करायची आहे', असे बोलायचे. सुरुवातीला तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, काही दिवसांपासून ते चोरुन तिचा पाठलाग करीत होते. पवार, गायकवाड आणि अनोळखी अशा तिघांनी तिचे फोटो काढत पीडितेकडे शरीरसुखाची मागणी केली. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. आरोपीने अशाप्रकारे महिलेची छेड काढल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी विनयभंगासह इतर कलमांतर्गत तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS