तरुणीच्या मैत्रिणीने तिला घरी बोलावून तुला इथेच तिघांबरोबर थांबावे लागेल, नाही तर आम्ही तुला मारुन टाकू अशी धमकी देऊन तिघांनी तिच्यावर आळी...
तरुणीच्या मैत्रिणीने तिला घरी बोलावून तुला इथेच तिघांबरोबर थांबावे लागेल, नाही तर आम्ही तुला मारुन टाकू अशी धमकी देऊन तिघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार (Gang Rape In Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) मैत्रिणीसह दोघांना अटक केली आहे.
भरत रोहिदास गव्हाणे (वय २८) आणि सुनोमो भरत गव्हाणे ऊर्फ सुमोना नूर इस्लाम शेख (वय २४, दोघे रा. वडगाव, सिंहगड रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार आरोपीच्या घरी ३ जानेवारी रोजी घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मैत्रिण हिने फिर्यादी तरुणीला आपल्या घरी नेले. तेथे तिला तिने तुला इथेच या तिघांसोबत थांबाव लागेल, नाही तर आम्ही तुला मारुन टाकू, असे धमकावले. त्यानंतर तिघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. त्यावेळी तिला आरडाओरडा केला तर मारण्याची धमकी दिली. त्यानंतर या तरुणीने भारती विद्यापीठ पोलिसांकडे धाव घेऊन आपल्यावर बेतलेली आप बिती सांगितली. पोलिसांनी तातडीने तिच्या मैत्रिणीसह दोघांना अटक केली असून अन्य दोघांचा शोध सुरु आहे. सहायक पोलीस निरीक्षक स्रेहल थोरात (Snehal Thorat PSI) तपास करीत आहेत.
COMMENTS