प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर ) नारायणगाव ( प्रतिनिधी ) -- पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळ, कृषि विज्ञान केंद्राम...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )
नारायणगाव ( प्रतिनिधी ) -- पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळ, कृषि विज्ञान केंद्रामध्ये ग्लोबल कृषि महोत्सव २०२५ पीक प्रात्यक्षिके, कृषि प्रदर्शन व पीक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जांभूळ लागवड तंत्रज्ञान यावर आधारित आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेस शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
याबाबत अधिक माहिती अशी की, साधारणपणे दहा ते पंधरा वर्षापूर्वी जांभूळ हे एक शेतातील बांधावर येणारे एखांदे झाड म्हणून त्याकडे पाहिले जात होते. परंतु अलिकडच्या काळात काही शेतकऱ्यांनी धाडस करीत जांभूळाच्या बांधावरच्या एक दोन झाडावरुन थेट शेतात एकर स्वरूपात आणले. प्रत्यक्षात फळे यायला तीन ते सहा वर्षे लागत असली तरी अनेक शेतकऱ्यांनी लागवडीचा प्रयोग करीत आज चांगली प्रगती केली आहे. जांभूळ हे मधुमेहावर अत्यंत गुणकारी असल्याने मागणी भरपूर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना किलोमागे 100 ते 400 - 500 पर्यंत दर मिळतो. अलिकडच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात जांभूळ लागवड होत आहे. परंतु पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत नाही. त्यासाठी
पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळ, कृषि विज्ञान केंद्रामध्ये गेल्या काही वर्षांपासून जांभूळ लागवड केलेल्या शेतकऱ्यांना त्याविषयी माहिती मिळावी याकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते.
कार्यशाळेत दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील तज्ञांसह इतरांचे मार्गदर्शन मिळते. 12 जानेवारी रोजी झालेल्या कार्यशाळेत जांभूळ लागवडीपासून ते रोगराई, फवारणी, मार्केटिंग, जांभळा पासून उपपदार्थ बनविणे
व इतर महत्वाच्या बाबींवर तज्ञांचे मार्गदर्शन लाभले.उद्यानविद्या महाविद्यालय डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथील प्रा. डॉ. नितेश दळवी यांनी जांभूळ लागवड करण्यासाठी जमीन, हवामान, पाणी, अन्नद्रव्ये, जांभूळ जाती, आणि येणारे उत्पन्न, बाजार भाव, पॅकिंग आणि वाहतूक ह्या विषयावर मार्गदर्शन केले. जांभूळ दरवर्षी आणि लवकर येण्यासाठी विद्यापीठात केलेल्या प्रयोगांची माहिती दिली.
याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन कृषी रत्न अनिलतात्या मेहेर, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष सुजित खैरे,गुलाबशेठ नेहरकर निर्यातदार,जांभूळ बागाईतकर संघाचे अध्यक्ष राजेंद्र तोडकर, ज्ञानेश कुटे, रायपूर छत्तीसगड येथील व्हिएनार नर्सरीचे फलोत्पादन तज्ञ प्रियदर्शन देवान,राहूल घाडगे
तसेच नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाचे सदस्य तानाजीशेठ वारूळे,ऋषिकेश मेहेर, सोमजीभाई पटेल,रत्नदिप भरवीरकर यांचे मार्गदर्शन लाभले. जांभूळ बाजारात लवकर येण्यासाठी काय करावे,
जास्त उत्पादन येण्यासाठी,
क्रॅकिंग साठी, झाडांची उंची कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा.
नवीन जातींचा शोध घ्यावा संपूर्ण घड एकदमच पिकला पाहिजे.सर्वात महत्त्वाचे पाण्याचा ताण कधी आणि कसा द्यायचा अशा प्रकारे शेतकऱ्यांनी तज्ञांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.
शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत कृषि विज्ञान केंद्राचे अध्यक्ष राजेंद्र तोडकर,विषयतज्ञ
भरत टेमकर, अध्यक्ष जांभूळ बागाईतदार संघ., दिनेश भुजबळ सचिव, रामकृष्ण आगरकर, सुरेश गायकवाड यांनी सहभाग घेतला.जांभूळ बागाईतकर संघाची वाटचाल ह्या विषयावर प्रवर्तक संचालक ज्ञानेश कुटे यांनी सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्यानविद्या विषयतज्ञ, कृषि विज्ञान केंद्र नारायणगाव येथील
भरत टेमकर यांनी केले.
COMMENTS