लखनौ (उत्तर प्रदेश): मेरठच्या लिसाडी गेट परिसरात एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मारेकऱ्यांनी पाचही जणांची हत्या...
लखनौ (उत्तर प्रदेश): मेरठच्या लिसाडी गेट परिसरात एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मारेकऱ्यांनी पाचही जणांची हत्या केल्यानंतर घराला बाहेरून कुलूप लावून पळ काढला होता.
मृत व्यक्तीच्या भावाने घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर धक्कादायक घटना समोर आली.
घरात मृत मोईन, त्याची पत्नी आणि ३ मुलांचे मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत दिसल्यानंतर भावाला धक्का बसला. पती-पत्नीचे मृतदेह चादरीत गुंडाळलेले तर मुलांचे मृतदेह बेड बॉक्समध्ये आढळले. घरात सर्वत्र वस्तू विखुरलेल्या आणि रक्ताचे डाग पसरलेले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
मृताचा भाऊ सलीम म्हणाला, ‘मी माझ्या पत्नीला घेऊन रुग्णालयात गेलो होतो. डॉक्टरांना भेटल्यानंतर मी मोईनला भेटायला त्याच्या घरी पोहोचलो. भाऊ मोईनचा फोन काल रात्री ११ वाजल्यापासून बंद होता. आम्ही आमच्या कुटुंबात आणि नातेवाईकांकडे त्याला शोधण्याचा प्रयत्न केला होता. शिवाय, घराबाहेर कुलूप होते. आम्ही शेजारच्या छतावरून उडी मारून आत आलो. कुलूप तोडले. घरातील लाईट सुरू केली असताना पाच मृतदेह आढळले. माझा भाऊ आणि माझ्या वहिनीचा मृतदेह बेडवर पडलेला होता. तर पुतण्यांचे मृतदेह बेडच्या बॉक्समध्ये कोंबलेल्या अवस्थेत होते.
प्राथमिक तपासात पाचही जणांचा गळा चिरून खून करण्यात आल्याचे उघड झाले. पती पत्नीची हत्या करून त्यांचे मृतदेह चादरीत गुंडाळले होते. तर मुलांचे मृतदेह एका पोत्यात भरून ते बेडमध्ये लपवण्यात आले होते. एकाच कुटुंबातील पाच जणांची अशाप्रकारे हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
COMMENTS